Uttar Pradesh government jobs character verification : उत्तर प्रदेश सरकारने सरकारी नोकऱ्यांसाठी थेट भरती होणाऱ्या उमेदवारांच्या चारित्र्य पडताळणीचे नियम अधिक कडक केले आहेत. आ उमेदवार 'सत्ता परिवर्तन' (रेजिम चेंज )घडवून आणण्याच्या उद्देशाने केलेल्या हिंसक कारवायांमध्ये सहभाग असल्याचे आढळणार्यांना सरकारी नोकरी नाकारली जाऊ शकते.
मागील काही दिवसांपूर्वी देशातील विविध भागात सरकारविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान 'सत्ता परिवर्तन' करण्याच्या आवाहनावरून निर्माण झालेल्या राजकीय वादविवादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश सरकारने स्पष्ट केले आहे की, केवळ एखाद्या उमेदवाराची राजकीय विचारधारा वेगळी आहे, म्हणून त्याला सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवता येणार नाही.तसेच, केवळ गुन्हा दाखल झालाआहे किंवा एखादी चौकशी प्रलंबित आहे, या कारणास्तव अर्जदाराला आपोआप अपात्र ठरवले जाणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
काँग्रेस आणि 'इंडिया' (INDIA) आघाडीतील इतर पक्षांनी मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप केला असून, निवडणूक आयोगाकडे उत्तरदायित्वाची मागणी केली आहे. १२ ऑक्टोबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर विरोधी नेत्यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने 'लोकशाहीसाठी मोर्चा' (March for Democracy) काढण्यात आला होता.
आता इंडिया आघाडीच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर 'व्होट बचाव, देश बचाव' (Vote Bachao, Desh Bachao) रॅली आयोजित करणार आहे. या सभेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि 'मत चोरी'च्या (vote theft) आरोपांवर कारवाई करण्याची मागणी प्रामुख्याने केली जाण्याची शक्यता आहे.