US Removes PoK India Map file photo
राष्ट्रीय

US Removes PoK India Map: अमेरिकेचा मोठा यू-टर्न! पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये दाखवलेला नकाशा हटवला

भारत आणि अमेरिकेमध्ये अलिकडेच झालेल्या अंतरिम व्यापार करारानंतर अमेरिकेने अखंड भारताचा नकाशा शेअर करून सर्वांना धक्का दिला होता.

मोहन कारंडे

US Removes PoK India Map

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांनी अंतरिम व्यापार करारासाठी ७ फेब्रुवारी रोजी एक आराखडा जाहीर केल्यानंतर अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने ऑनलाईन प्रसिद्ध केलेल्या एका नकाशाने जगाचे लक्ष वेधून घेतले होते. या नकाशात संपूर्ण जम्मू-काश्मीर प्रदेश त्यात पाकव्याप्त काश्मीर याचाही समावेश भारताचा भाग म्हणून दाखवण्यात आला होता, चीनकडून दावा करण्यात येणारा अक्साई चीन हाही भारताचा भाग दर्शवण्यात आला होता. मात्र, आता अमेरिकेने पुन्हा एकदा यू-टर्न घेतला असून भारताचा तो नकाशा हटवला आहे.

भारत आणि अमेरिकेमध्ये अलिकडेच झालेल्या अंतरिम व्यापार करारानंतर अमेरिकेने अखंड भारताचा नकाशा शेअर करून सर्वांना धक्का दिला होता. या नकाशात अमेरिकेने वादग्रस्त भागांऐवजी पीओके आणि अक्साई चीन हे भारताचे अविभाज्य भाग म्हणून दाखवले होते. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याची भूमिका भारताने नेहमीच मांडली असली, तरी हा नकाशा अमेरिकेच्या आधीच्या नकाशांपेक्षा वेगळा होता. यापूर्वी अमेरिकेच्या नकाशांमध्ये हा वादग्रस्त प्रदेश म्हणून दाखवला जात असे.

या पावलाची वेळही महत्त्वाची मानली जात होती. कारण, तणावपूर्ण काळानंतर भारत आणि अमेरिका द्विपक्षीय संबंध नव्याने मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधी ट्रम्प प्रशासनाने भारतीय वस्तूंवर ५० टक्के आयात शुल्क लावले होते, जे अमेरिकेच्या मित्रदेशांमध्ये सर्वाधिक होते. मात्र, या अंतरिम व्यापार आराखड्याअंतर्गत हे शुल्क आता १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले असून, कोणत्याही आशियाई देशासाठी हे सर्वात कमी आहे. तितकेच महत्त्वाचे म्हणजे अक्साई चीनचा भारताचा भाग म्हणून करण्यात आलेला समावेश. भारताच्या आक्षेपांनंतरही चीन या प्रदेशावर सातत्याने दावा करत आला आहे. जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशासह भारताच्या सीमांचे चुकीचे चित्रण केल्याबद्दल परदेशी सरकारे आणि जागतिक संस्थांकडे भारताने वारंवार चिंता व्यक्त केली आहे.

रणनीती की चूक?

अमेरिकेचे पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांशी बिघडत चाललेले संबंध पाहता हे पाऊल भारतासाठी जाणूनबुजून केलेले राजनैतिक संकेत होते असे अनेक तज्ञांचे मत होते. तर काही तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी अमेरिकेच्या या भूमिकेचे स्वागत केले होते. मात्र, चार दिवसानंतर आज अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह (यूएसटीआर) कार्यालयाने भारताचा नकाशा दर्शविणारी एक्स पोस्ट त्यांच्या अधिकृत खात्यावरून काढून टाकली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT