US Citizen Arrest Near Nepal PUDHARI
राष्ट्रीय

US Citizen Arrest Near Nepal: अमेरिकेची भारतात लुडबूड..? नेपाळ जवळ संशयास्पद हालचाली करणाऱ्या माजी US Navy अधिकाऱ्याला अटक

Anirudha Sankpal

US Citizen Arrest Near Nepal: उत्तर प्रदेशातील महाराज गंज जिल्ह्यातील सशस्त्र सीमा बलाने भारतातून नेपाळमध्ये जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३६ वर्षाच्या अमेरिकी नागरिकाला अटक केली आहे. त्याच्याकडे अधिकृत कागदपत्रे नव्हती. या व्यक्तीने त्याचे नाव जॉर्डन ब्राऊन असं सांगितलं आहे. तो अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील आहे.

रविवारी SSB चे जवान रूटीन पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी सीमेजवळील पिलर नंबर ५१६ जवळ ब्राऊन याला अटक करण्यात आली. तो बॉर्डर क्रॉस करत असताना जवानांनी त्याला थांबण्यास सांगितलं होतं. यानंतर आरोपी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र भारतीय जवानांनी त्याला पकडलं. त्याच्याकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नव्हती. किंवा त्याची ओळख सांगणारे कोणतेही वैध डॉक्युमेंट नव्हते अशी माहिती महाराजगंज अतिरिक्त एसपी सिद्धार्थ यांनी सांगितलं.

पोलिसांना चौकशीदरम्यान ब्राऊन हा थायलंडमधून टुरिस्ट व्हिसावर आला होता. तिथं त्याचा पासपोर्ट हरवला. ब्राऊनने पोलिसांना सांगितलं की तो माजी युएस नेव्ही ऑफिसर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तो समुद्राच्या मार्गाने श्रीलंकेत पोहचला होता. त्यानंतर तो समुद्र मार्गानेत २ नोव्हेंबर २०२५ मध्ये भारतात दाखल झाला. तेव्हापासून तो गोव्यात रहात होता.'

अधिकाऱ्यांनी सांगितलं की तो गोव्यातून बंगळुरूला आला. तेथून तो सोनौली बॉर्डर भागातून नेपाळमध्ये प्रवेश करणार होता. त्याने नेपाळमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला वैध प्रवासी डॉक्युमेंट नसल्यामुळं आणि ओळख पटवणारा पुरावा नसल्यामुळं अटक करण्यात आली.

त्याची झाडाझडती घेतल्यावर त्याच्याकडून ३१ हजार २६० रूपये कॅश आणि दोन मोबाईल फोन रिकव्हर करण्यात आले. मात्र ब्राऊनला पासपोर्ट काही सादर करता आला नाही. त्याची एसएसबी कडून चौकशी सुरू करण्यात आली. त्यानंतर इतर सुरक्षा एजन्सीजनी देखील त्याची चौकशी केली. या चौकशीनंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी उत्तर प्रेदश पोलिसांकडे त्याला सुपूर्द करण्यात आलं.

पोलीस ब्राऊनने केलेला दावे तपासून पाहत आहेत. त्याच्याविरूद्ध सोनौली पोलीस ठाण्यात इमिग्रेशन अँड फॉरेनर्स अॅक्ट एन्टरिंग इन इंडिया सेक्शन २१/२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे. त्याच्यावर भारतात वैध कागदपत्रांशिवाय प्रवेश करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT