China Shadow Transshipment pudhari
राष्ट्रीय

China Shadow Transshipment: चीनच्या मदतीसाठी भारतासह ४० देशांचे 'शॅडो नेटवर्क'... अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये पुण्याचाही उल्लेख

Anirudha Sankpal

China Shadow Transshipment: अमेरिकेने त्यांनी चीनवर लादलेल्या टॅरिफला बायपास करण्यासाठी जवळपास ४० देश चीनला मदत करत असल्याचा आरोप केला आहे. या ४० देशात भारताचा देखील समावेश आहे. शॅडो नेटवर्कद्वारे चीन अमेरिकेचे जाचक टॅरिफ बायपास करत आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी AI च्या मदतीने एक प्लॅन तयार करण्यात येत आहे. त्याद्वारे अशा शिपमेंटचा शोध घेऊन त्याविरूद्ध कारवाई करण्यात येणार आहे.

पेटर नावारो यांनी रिलीज केलेल्या द ग्रेट ट्रान्सशिपमेट स्कॅम या मथळ्याने लिहिलेल्या रिपोर्टनुसार हे शॅडो नेटवर्क हे २०१८ पासून वाढण्यास सुरूवात झाली. पेटर नावरो हे डोनाल्ड ट्रम्प यांचे वरिष्ठ व्यापार सल्लागार आहेत. त्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार तिसऱ्या देशाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला जवळपास ४० बिलियन ते ३०३ बिलियन युएस डॉलर्सच्या वस्तू रिरूट केल्या जातात.

चीनच्या या शॅडो नेटवर्कमध्ये जवळपास ४० देश असून यात अमेरिकेचे सर्वात मोठे व्यापारी भागीदार देखील आहेत. यात मॅक्सिको, कॅनडा, युरोपियन युनियन, भारत, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांचा देखील समावेश आहे.

नावारो पुढे सांगतात की अशी एक व्यवस्था निर्माण केली आहे ज्याद्वारे कम्युनिस्ट चीन त्यांचा निर्यात माल या ४० पेक्षा जास्त देशांमधून पुढे नेते. या देशांमधून फार कमी प्रोसेसिंग होऊन चीनी उत्पादने पुढे सरकतात, त्यांच्यावर रिलेबलिंग होतं. त्यांचे पुन्हा इनवॉईसिंग होतं आणि शिपिंग रूट बदलले जातात. यामुळं ही उत्पादने वेगळ्या देशातून आल्याचे भासवलं जातं. मात्र याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर चीनमध्येच होतं.

चीनी उत्पादक आणि व्यापारी कंपन्या त्यांचे उत्पादन या देशांमधून कमी लेबर कॉस्ट, फ्री ट्रेड झोन किंवा फेव्हरेबल अॅक्सेमार्फत अमेरिकेच्या बाजारात उतरवतात.

नावारोच्या या रिपोर्टमध्ये भारतातील पुणे, गुजरात, चेन्नई या मॅन्युफॅक्चरिंग बेल्टचा वापर केला जातो असं सांगण्यात आलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT