crime news File Photo
राष्ट्रीय

Crime News: ‘दुसऱ्या पुरुषाशी फोनवर बोलते...’; संशयाच भूत डोक्यात शिरलं अन् झोपेत असलेल्या पत्नीचं मुंडकं तोडलं

चारित्र्याच्या संशयातून झोपेत असलेल्या पत्नीची पतीने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना हरदोईच्या इस्लामनगर तिलिया भागात बुधवारी पहाटे घडली.

मोहन कारंडे

Crime News

उत्तर प्रदेश: चारित्र्याच्या संशयातून झोपेत असलेल्या पत्नीची पतीने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना हरदोईच्या इस्लामनगर तिलिया भागात बुधवारी पहाटे घडली. हत्या केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. परवेझ (वय ३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, नगमा (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्लामनगर तिलिया परिसरातील भाड्याच्या घरात बुधवारी पहाटे ही घटना घडली. १२ वर्षापूर्वी नगमा आणि परवेझ यांचा विवाह झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून दोघांच्यात वाद सुरू होता.

नगमा दुसऱ्या पुरूषासोबत फोनवर बोलते असा संशय परवेझला होता. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याच रागातून बुधवारी पहाटे नगमा गाढ झोपेत असताना परवेझने धारदार शस्त्राने तिच्यावर वार करत तिचे शीर धडावेगळे केले.

नगमाची बहीण सब्बो हिने परवेझवर गंभीर आरोप केले आहेत. नगमाचा तिच्या पतीकडून शारीरिक छळ सुरू होता असा आरोप तिने केला आहे. हत्येच्या काही दिवस आधीही परवेझने नगमाचा गळा चिरण्याची धमकी दिली होती, असे तिने सांगितले.

या घटनेच्या वेळी परवेझचे काही नातेवाईकही घरात उपस्थित होते, असा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. नगमाची आई जाहिदा यांनीही मुलीला पती आणि सासरच्या मंडळींकडून वारंवार त्रास आणि धमकावण्याचे प्रकार सहन करावे लागल्याचा आरोप केला. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू असून नातेवाईकांच्या आरोपांच्या आधारे पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT