Piyush Goyal News Pudhari
राष्ट्रीय

Union Cabinet reshuffle|केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल ?

Union Cabinet reshuffle - फेररचनेत तरुण चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचे संकेत

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : भाजपच्या पक्ष संघटनेतील बदलांनंतर, केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलांची तयारी वेगवान झाली आहे. ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळात काही नवीन चेहऱ्यांचा समावेश आणि काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होण्याची चर्चा आहे. या फेरबदलांचा महाराष्ट्रातील सत्तेवर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही.

श्रीकांत शिंदे, अनुराग ठाकूर, सूर्या शक्य

केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलांमध्ये अनेक तरुण चेहऱ्यांचा समावेश होऊ शकतो. विविध राज्यांमधील तरुणांमधील अलीकडील राजकीय वातावरण आणि 'जेन-झी' चळवळींचा प्रभाव लक्षात घेता, पक्ष सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना अधिक प्रतिनिधित्व देण्याची तयारी करत आहे. यामध्ये कर्नाटकचे तेजस्वी सूर्या, महाराष्ट्राचे श्रीकांत शिंदे, हिमाचल प्रदेशचे अनुराग ठाकूर यांच्या नावांची चर्चा होत आहे.

मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यामागे केवळ तरुणांचे प्रतिनिधित्व वाढवणे हाच उद्देश नाही. विविध राज्ये आणि सामाजिक गटांमध्ये आपला राजकीय प्रभाव अधिक दृढ करण्यासाठी भाजप मंत्रिमंडळातही समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे.

पीयूष गोयल मंत्रिमंडळात कायम राहणार

केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची भाजपचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, त्यांच्या भविष्याबाबत बरीच चर्चा रंगली होती. नवीन टीममध्ये महत्त्वाची भूमिका स्वीकारल्यानंतर गोयल केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडतील का, असे प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, पक्षाच्या सूत्रांनुसार तसे होण्याची शक्यता नाही. गोयल मोदी सरकारमध्ये मंत्री म्हणून कायम राहतील आणि त्यासोबतच संघटनात्मक जबाबदाऱ्याही सांभाळतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT