Budget 2026 Present On Sunday: देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प हा रविवारी सादर केला जाणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज (दि. १२ जानेवारी) केंद्रीय अर्थसंकल्प हा १ फेब्रुवारी रोजीच सादर होणार आहे अन् तो रविवारीच सादर होणार आहे असं सांगितलं. यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. त्या आपला आठवा अर्थसंकल्प संसदेच्या पटलावर ठेवणार आहेत.
केंद्रीय संसदीय मंत्री किरण रिजीजू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वेळापत्रक गेल्या आठवड्यात जाहीर केलं. त्यांनी यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेश हे २८ जानेवारी आणि २ एप्रिल दरम्यान दोन सत्रात होणार आहे.
याबाबतचा निर्णय रिजीजू यांनी सोशल मीडियावर शेअर केला. ते म्हणाले, 'भारत सरकारच्या शिफरसीनुसार भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ साठी दोन्ही सभागृहांचे सत्र भरवण्याची परवानगी दिली आहे. हे सत्र २८ जानवारी रोजी सुरू होईल अन् २ एप्रिल रोजी संपुष्टात येईल.'
रिजीजू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र १३ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येईल त्यानंतर दुसरे सत्र हे ९ मार्च रोजी सुरू होईल. केंद्रीय अर्थसंकल्प हा १ फेब्रुवारी रोजी म्हणजे रविवारी सादर होणार आहे.
प्रत्येक वर्षीचे पहिले संसदीय संत्र हे अर्थसंकल्पीय सत्र असते. या संसदीय सत्राची सुरूवात ही राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होते. यावेळी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना एकत्रित संबोधित करत असतात.
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर जुलै-ऑगस्ट महिन्यात पावसाळी अधिवेशन आणि नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन होतं.