उदयनिधी स्टॅलिन यांना अटक, चेन्नईत गोंधळ; मुख्यमंत्री विजय यांच्यावर केली होती त्रिशावरून आक्षेपार्ह टीका  File Photo
राष्ट्रीय

Udhayanidhi Stalin : उदयनिधी स्टॅलिन यांना अटक, चेन्नईत गोंधळ; मुख्यमंत्री विजय यांच्यावर केली होती त्रिशावरून आक्षेपार्ह टीका

कावेरी जलविवादावरून मुख्यमंत्री विजय थलपती यांच्यावर टीका करत असताना उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यामुळे वाद

पुढारी वृत्तसेवा

udaynishi stalin detained after double meening vulgar comment actress trisha thalapathy vijay

पुढारी ऑनलाईन : कावेरी नदीच्या पाणीवाटपाच्या वादावरून मुख्यमंत्री विजय थलपती यांच्यावर निशाणा साधताना एम.के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी अभिनेत्री त्रिशाबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

कावेरी जलविवादावरून मुख्यमंत्री विजय थलपती यांच्यावर टीका करत असताना उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. रॅलीदरम्यान गर्दीत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने “त्रिशा, त्रिशा” अशा घोषणा दिल्या. त्यावर उदयनिधींनी आपले भाषण थांबवून हसत कथितरित्या द्विअर्थी आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली.

या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात राजकीय विरोध झाला सुरू..

तमिळनाडू भाजपचे मुख्य प्रवक्ते नारायणन तिरुपती यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत उदयनिधींच्या कथित “द्विअर्थी” वक्तव्याचा निषेध केला. त्यांनी हे वक्तव्य “घृणास्पद, अश्लील, आक्षेपार्ह आणि लज्जास्पद” असल्याचे म्हटले.

भाजप नेत्याने म्हटले की, “एखादा बदमाश किंवा चोर असला तरी तोही इतक्या अश्लील भाषेत बोलणार नाही. कोणतीही आई, पत्नी किंवा मुलगी अशा प्रकारची टिप्पणी करणाऱ्या व्यक्तीला माफ करणार नाही.” या टिप्पणीबद्दल उदयनिधी स्टॅलिन यांना अटक करून तुरुंगात पाठवावे, अशी मागणीही त्यांनी केली.

तिरुपती यांनी पुढे म्हटले की, “अशा खालच्या दर्जाच्या भाषेसाठी उदयनिधी स्टॅलिन यांना अटक करून तुरुंगात पाठवणे हे तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांसाठी मार्कंडेयन (द्रमुक आमदार) यांच्या अटकेपेक्षा अधिक श्रेयस्कर ठरेल. आता या टिप्पणीसाठी न्यायालय त्यांना शिक्षा करते की जामीन मंजूर करते, हे पाहावे लागेल.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT