Pradip Negi and Kapil Negi with wife Sunita Chauhan x
राष्ट्रीय

Polyandry in Himachal | दोन भावांचे एकाच मुलीशी लग्न! हिमाचलमध्ये अनोखा विवाह; जाणून घ्या हट्टी समुदायातील दुर्मिळ द्रौपदी प्रथा?

Polyandry in Himachal | वधु-वर म्हणतात - आम्हाला आमच्या परंपरेचा अभिमान आहे; तीन दिवस चालले विधी, नातेवाईक-ग्रामस्थांची उपस्थिती

Akshay Nirmale

Himachal Hatti community Open polyandry celebration Two brothers one wife marriage Unique Indian wedding tradition Draupadi Pratha Sirmaur

शिल्लाय, सिरमौर (हिमाचल प्रदेश) : एक वधू... आणि तिचे दोन वर. ऐकून थोडं अजब वाटेल. पण हिमाचल प्रदेशाच्या निसर्गरम्य शिल्लाय गावात नुकताच असा एक विवाह पार पडला. यामुळे येथील पारंपरिक हट्टी समुदायात एक दुर्मिळ पण शतकांपासून चालत आलेली प्रथा – बहुपतीत्व (Polyandry) – पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

विशेष म्हणजे या द्रौपदी प्रथेला नवा श्वास देत, प्रदीप आणि कपिल नेगी या सख्ख्या भावांनी सुनिता चौहानशी एकत्र पारंपरिकरित्या विवाह केला. हा विवाह तिघांच्याही पूर्ण सहमतीने झाला आहे.

नातेवाईक, ग्रामस्थांचा दांडगा  उत्साह

हा विवाहसोहळा 12, 13 आणि 14 जुलै 2025 रोजी पार पडला. या तीन दिवसांच्या उत्सवात हट्टी समुदायातील सांस्कृतिक परंपरेसाठी अनेकजण सहभागी झाल्याचे कळते. हा विवाह खुलेपणाने साजरा करण्यात आला

तीन दिवस चाललेल्या या विवाहसोहळ्यात परिसरातील नातेवाईक, गावकरी आणि पाहुण्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वधु आणि वरांना आशिर्वाद दिले.

पारंपरिक पहाडी गाण्यांवर डान्स, पारंपरिक ट्रान्स-गिरी खाद्यपदार्थांची मेजवानी, आणि सर्वत्र आनंदी वातावरण यामुळे संपूर्ण विवाहसोहळा संस्मरणीय ठरला.

कुन्हाट गावातील रहिवासी असलेली वधू सुनिता आणि तिचे नातेवाईकही यात उत्साहाने सहभागी झाले.

काय आहे परंपरा?

हट्टी समुदायामध्ये बहुपतीत्व किंवा द्रौपदी प्रथा म्हणून ओळखली जाणारी ही प्रथा आजही ट्रान्स-गिरी परिसरात (सिरमौर जिल्ह्यात) आणि उत्तराखंडच्या काही भागांत आढळते. या पद्धतीनुसार एका स्त्रीचा विवाह अनेक भावांशी एकत्र केला जातो. यामागे प्रमुख हेतू म्हणजे:

  • कौटुंबिक एकता टिकवणे

  • पिढीजात मालमत्तेचे विभाजन टाळणे

  • विधवा स्त्रियांना आधार देणे

कालांतराने आधुनिकतेच्या प्रभावामुळे ही प्रथा लोप पावत चालली होती, पण या विवाहाने या प्रथेला पुन्हा सामाजिक मान्यता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय म्हणतात जोडीदार?

वर प्रदीप नेगी-

प्रदीप जलशक्ती विभागात कार्यरत आहे. तो म्हणाला की, "हा आमचा एकत्रित निर्णय होता. विश्वास, काळजी आणि जबाबदारी सामायिक करण्याचा हा आमचा मार्ग आहे. आम्ही ही प्रथा उघडपणे पाळली कारण आम्हाला आमच्या इतिहासाचा अभिमान आहे."

वर कपिल नेगी-

कपिल परदेशात हॉस्पिटॅलिटी व्यवसायात कार्यरत आहे. तो म्हणाला की, "मी परदेशात राहतो, पण हा विवाह आमच्या पत्नीला आधार, सुरक्षा आणि प्रेम देणारा आहे. आम्ही पारदर्शकतेवर विश्वास ठेवतो."

वधू सुनिता चौहान-

हिनेही यावर मत मांडताना सांगितले, "ही माझी स्वतःची निवड होती. कोणताही दबाव नव्हता. या परंपरेची मला कल्पना होती आणि मी ती जाणून-बुजून स्वीकारली. आम्ही एकत्र हा संकल्प केला आहे आणि आमच्या नात्यावर मला पूर्ण विश्वास आहे."

गुप्तपणे सुरू होती प्रथा...  

ही प्रथा उजला पक्ष, जोडीदारन या नावानेही ओळखली जाते. हट्टी समुदायातील ही प्रथा शेवटच्या वर्षांपर्यंत गुप्तपणे चालू होती. परंतु, या विवाहात ती सोशल मीडिया आणि गावात उघडपणे साजरी झाली

या विवाहाने पूर्वी ‘गुप्त विवाह’ म्हणून केलेल्या घटनांना सार्वजनिक स्वरूप दिलं; म्हणूनच हा अशाप्रकारचा एक दुर्मिळ उघड विवाह असल्याने त्याची चर्चा होत आहे.

हत्ती समुदायाला सुमारे अनुसूचित जमाती (Scheduled Tribe) म्हणून मान्यता मिळाल्याची माहिती आहे. सोशल मीडियावरूनही ही घटना व्हायरल झाली आहे. तथापि, भारतातील नागरी कायद्यानुसार फक्त एकाच पत्नीशी विवाह वैध मानला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT