राष्ट्रीय

ट्विटरने व्हिसलब्लोअरला दिले ७० लाख डॉलर; मस्क म्हणाले, यामुळेच केली डील रद्द

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ईलॉन मस्क आणि ट्विटरमध्ये 44 अब्ज डॉलर्सच्या करारावर सुरू असलेल्या कायदेशीर लढाईमध्ये एक वेगळं वळण आले आहे. मस्क यांनी शुक्रवारी ट्विटरला सांगितले कि, व्हिसलब्लोअरला लाखो डॉलर्स देण्याच्या निर्णयामुळे त्याला मायक्रोब्लॉगिंग जायंट विकत घेण्याचा करार संपुष्टात आणण्याचे आणखी एक वैध कारण मिळाले. अमेरिकन मॅगझिन वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानंतर मस्क यांनी हे वक्तव्य केले आहे. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की ट्विटरने अलीकडेच एका व्हिसलब्लोअरसोबतच्या वादावर तोडगा काढण्यासाठी ७० लाख डॉलर देण्याचे ठरवले आहे.

मस्क यांनी ट्विटरच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे
या अहवालानंतर मस्कच्या वकिलाने ट्विटरला एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात असं म्हटलं आहे कि, ट्विटरने पीटर जटको (व्हिसलब्लोअर) आणि त्यांच्या वकिलांना ७७. लाख डॉलर देण्यापूर्वी त्याची संमती घेतली नाही, हे विलीनीकरणाच्या कराराचे उल्लंघन आहे.

कोण आहेत पीटर जटको
पीटर जटको ट्विटरचे माजी सुरक्षा अधिकारी होते. या वर्षाच्या सुरवातीला त्यांना सोशल मीडिया कंपनीने आपल्या मजबूत सुरक्षा योजनेचा खोटा वापर केल्याच्या आरोपावरून काढून टाकण्यात आले होते.नियामकांना त्याच्या खराब सायबर सुरक्षा मानकांबद्दल चुकीची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी ट्विटरवर आरोप केला की कंपनीने बनावट खाती आणि चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांकडे दुर्लक्ष केले.

मस्क यांनी ट्विटर करार मोडला आहे
यापूर्वी, टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ मस्क म्हणाले होते की, ट्विटर बनावट खाती, स्पॅम आणि बॉट्सवर चालते. त्यामुळे त्यांना हा करार रद्द करावा लागला होता. त्याच वेळी, मंगळवारी मस्क यांनी ट्विट केले की त्यांच्या ट्विटवरील 90 टक्क्यांहून अधिक कमेंट्स बॉट्स आणि स्पॅम होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT