झारखंडमध्ये मोठा रेल्वे अपघात file photo
राष्ट्रीय

Howrah Mumbai Mail Accident | झारखंडमध्ये मोठा रेल्वे अपघात, हावडा-मुंबई मेलची मालगाडीला धडक

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : हावडाहून मुंबईला जाणाऱ्या मेलने मालगाडीला धडक दिली. झारखंडच्या चक्रधरपूर विभागातील राजखर्सवान-बदाबांबो स्टेशनदरम्यान हा अपघात झाला. बारांबूजवळ मंगळवारी पहाटे ३:४३ वाजता मालगाडीला धडकल्यानंतर हावडा-मुंबई मेलचे (१२८१०) २० डबे रुळावरून घसरले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले.

हावडाहून मुंबईला जाणारी मुंबई मेल सोमवारी रात्री ११:२ वाजता ऐवजी २:३७ वाजता टाटानगरला पोहोचली. दोन मिनिटांच्या थांब्यानंतर ती पुढील स्टेशन चक्रधरपूरला रवाना झाली, परंतु ही ट्रेन पोहोचली नाही. पुढच्या स्टेशनला पोहोचण्याआधीच पहाटे ३:४५ वाजता बाराबांजवळ अपघात झाला. जमशेदपूरपासून सुमारे ८० किमी अंतरावर असलेल्या बाराबांसजवळ हा अपघात झाला. अपघातत मुंबई-हावडा मेलचे २२ पैकी २० डबे रुळावरून घसरले. यामध्ये १६ प्रवासी डबे होते, एक पॅन्ट्री कार होती, तर एक पॉवर कार होती. अपघातात सहा प्रवासी जखमी झाले. सध्या या घटनेत जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

रेल्वे वाहतूक ठप्प

या अपघातामुळे दक्षिण पूर्व रेल्वेच्या टाटानगर-चक्रधरपूर विभागातील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत. रेल्वे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी रुळ दुरुस्त करण्यासाठी आणि रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT