Tiger viral video file photo
राष्ट्रीय

Tiger viral video: वाघही शिवभक्तीत लीन! चक्क जंगलातील शिवलिंगाला डोकं घासलं...; पाहा हा दुर्मिळ व्हिडिओ

Shivling forest tiger video: ढीमरखेडा तालुक्यातील शाहडारच्या जंगलातील एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. यामध्ये एक वाघ जंगलात असलेल्या महादेवाच्या शिवलिंगाला आपले डोकं घासताना दिसत आहे.

मोहन कारंडे

Tiger viral video

कटनी: मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातून एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. ढीमरखेडा तालुक्यातील शाहडारच्या जंगलातील एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. यामध्ये एक वाघ जंगलात असलेल्या महादेवाच्या शिवलिंगाला आपले डोकं घासताना दिसत आहे. हा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला असून, तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?

हे अनोखे दृश्य गेल्या बुधवारी उशिरा संध्याकाळचे आहे. शाहडार गावाजवळ असलेल्या जंगलात महादेवाचे एक प्राचीन शिवलिंग आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, वाघ अतिशय शांत स्वभावाने शिवलिंगाजवळ पोहोचतो आणि बराच वेळ त्यावर आपले डोकं घासतो.

शाहडारच्या जंगलात वाघ आणि बिबट्यांचे अस्तित्व असणे ही काही नवीन गोष्ट नाही. वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिक लोकांच्या मते, या भागात वन्यप्राण्यांचा वावर सतत असतो. मात्र, मानवी वस्तीच्या इतक्या जवळ वाघाचे असे वर्तन सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. काही लोक या घटनेला 'भक्ती'शी जोडत आहेत, तर वन अधिकाऱ्यांचे असे मत आहे की, वन्यप्राणी अनेकदा आपला गंध सोडण्यासाठी किंवा खाज सुटल्यास ती शमवण्यासाठी दगड किंवा कोणत्याही ठोस वस्तूवर आपले शरीर घासतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT