पुढारी ऑनलाईन डेस्क :
ज्ञानवापी मशीद प्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालयात दाखल याचिकेवर आता ४ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. १ जूनपासून न्यायालयास उन्हाळयाची सुटी सुरु होत आहे. त्यामुळे याप्रकरणी पुढील सुनावणी ४ जुलै रोजी होईल, असे न्यायालयाने आज स्पष्ट केले. ( Gyanvapi hearing )
आजच्या सुनावणीनंतर हिंदू पक्षाच्या वकिलांनी सांगितले की, ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणाची सीडी दोन्ही पक्षांना काही दिवसांनंतर दिली जाईल. श्रृंगार गौरी प्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी करु नये, अशी मागणी मुस्लिम पक्षांनी यापूर्वीच केली आहे. मुस्लिम पक्षाचे वकील अभय यादव यांनी दावा केला होता की, श्रृंगार गौरी खटला हा प्रार्थना स्थळे (विशेष तरतुदी) कायदा,१९९१ विरोधात आहे. यावेळी मुस्लिम पक्षाच्या वतीने १९९३ दिन मोहम्मद विरुद्ध राज्य सचिव या खटल्याचा दाखलाही वकिलांनी दिला हाेता.
हेही वाचलं का?