पुढारी ऑनलाईन डेस्क
राष्ट्रीय वैद्यक शास्त्र परीक्षा मंडळाने (NBEMS) राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा- पदव्युत्तर पदवी (NEET PG) २०२४ चा निकाल जाहीर केला आहे. ही परीक्षा दिलेले विद्यार्थी natboard.edu.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचा निकाल पाहू शकतात आणि निकाल डाउनलोड करु शकतात. नीट पीजी परीक्षा (NEET PG 2024) MD/MS/DNB/डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ११ ऑगस्ट २०२४ रोजी दोन शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आली होती.
काही दिवसांनंतर वैयक्तिक स्कोअरकार्डसह, परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांच्या गुणांची सूची असलेल्या पीडीएफमध्ये निकाल प्रसिद्ध केले जाईल. NBEMS निकालांसोबत NEET PG कट-ऑफ गुणदेखील जारी करणार आहे.
नीट पीजी २०२४ निकाल तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थी या स्टेप्स फॉलो करू शकतात.
स्टेप १ : अधिकृत वेबसाइट natboard.edu.in. ला भेट द्या.
स्टेप २ : होमपेजवर ‘Public Notice’ सेक्सशनखालील ‘Result of NEET PG 2024' लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३ : नोटीस स्क्रीनवर दिसेल.
स्टेप ४ : नोटीस वाचा आणि NEET PG 2024 चा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा.
स्टेप ५ : स्क्रीनवर PDF फाइलसह एक नवीन पेज दिसेल.
स्टेप ६ : तुमचा निकाल तपासा आणि तो डाउनलोड करा. त्याची प्रिंटआउट घ्या.
किमान पात्रता निकषांनुसार MD/MS/DNB/डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विविध श्रेणींसाठी कट-ऑफ टक्केवारी खालीलप्रमाणे आहे :