इंजिनिअरिंगला कॉम्प्युटर, डाटा सायन्स, एआयचा बोलबाला

सर्वाधिक 22 हजार 658 विद्यार्थ्यांना संगणक अभियांत्रिकीसाठी प्रवेश जाहीर
Huge demand of students for computer related courses
संगणकाशी संबंधित अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची प्रचंड मागणीFile image
Published on
Updated on

अभियांत्रिकी प्रवेशात सध्या संगणकाशी संबंधित अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची प्रचंड मागणी आहे. त्यामुळेच अभियांत्रिकी प्रवेशाच्या पहिल्या यादीत संगणक अभियांत्रिकी, डाटा सायन्स, एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अभ्यासक्रमांचा बोलबाला असून, सर्वाधिक 22 हजार 658 विद्यार्थ्यांना संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश जाहीर झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारचे एकूण 98 अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा राज्यभरात 1 लाख 60 हजार 346 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी 1 लाख 92 हजार 398 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरलेल्या 1 लाख 76 हजार 111 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 26 हजार 458 विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी मिळाली आहे.

काही अभ्यासक्रमांकडे पाठ

राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये काही अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसते. त्यानुसार फायर इंजिनिअरिंग, ऑईल फॅट्स अँड वॅक्सेस टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी आठ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला.

विषय शाखा - झालेले प्रवेश

संगणक अभियांत्रिकी : 22 हजार 658 (सर्वाधिक)

इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन : 14 हजार 747

मॅकेनिकल : 14 हजार 269

माहिती तंत्रज्ञान : 11 हजार 33

स्थापत्य : 9 हजार 814

विद्युत अभियांत्रिकी : 8 हजार 70

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डाटा सायन्स : 5 हजार 768

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रशिक्षण : 3 हजार 447

एआय आणि डाटा सायन्स : 2 हजार 186

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग : 2 हजार 162

संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकी : 2 हजार 127

इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक : 1 हजार 978

इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकशास्त्र : 1 हजार 74.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news