कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण; आरोपीची पॉलीग्राम टेस्ट करण्यास CBI ला परवानगी  File Photo
राष्ट्रीय

Kolkata Doctor Case| कोलकाता बलात्कार, हत्या प्रकरणातील मृत डॉक्टर तरुणीच्या डायरीची पाने गायब

Kolkata Doctor Case | पोलिसांना डायरीतून काहीच आढळले नाही; सीबीआयकडून डायरीच तपासाचा केंद्रबिंदू

पुढारी वृत्तसेवा

कोलकाता : वृत्तसंस्था

कोलकाता येथील आर. जी. कर रुग्णालय/वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर दररोज लिहीत असलेल्या डायरीतील काही पाने फाडून टाकण्यात आलेली असल्याची धक्कादायक माहिती सोमवारी समोर आली.

मृत डॉक्टर तरुणीच्या आईन माध्यमांना ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, ती दररोज डायरी लिहीत असे. पण, तिच्या डायरीतील अनेक पाने फाटलेली आहेत. डॉक्टर तरुणीच्या मृत्यूशी संबंधित काही रहस्ये नेमकी या पानांत दडलेली असण्याची शक्यता तिच्या आईने वर्तविली आहे.

पोलिसांनी अन्य पुराव्यांसह मृत डॉक्टर तरुणीची ही डायरी आणि लॅपटॉप सीबीआयकडे सोपविले आहेत. एसआयटीला या डायरीतून घटनेबाबतचे कुठलेही संकेत मिळाले नाहीत, असे कोलकाता पोलिसांकडून सांगण्यात आले. दुसरीकडे या डायरीचा सीबीआयने तपासाचा केंद्रबिंदू बनविलेले आहे.

तत्पूर्वी, मृत तरुणीच्या पित्याने सांगितले, अंत्यसंस्काराच्या वेळी स्मशानभूमीत ४ अन्य मृतदेह आधीच होते; पण पोलिसांनी सर्वांत आधी माझ्या मुलीवर अंत्यसंस्कार करायला लावले. मृत तरुणीचे पिता प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रकरणातील एकूण भूमिकेवर संतप्त आहेत.

घटना व घटनेवरील लोकांचा आक्रोश दडपण्याचेच काम सरकारने केल्याचा त्यांचा आरोप आहे. महाविद्यालय प्रशासनाकडून आम्हाला अजिबात सहकार्य नव्हते.

तोंडात बोळा घालून गळा आवळला; शवविच्छेदनाचा विस्तृत अहवाल समोर

कोलकाता येथील आर. जी. कर हॉस्पिटलच्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर पाशवी अत्याचार केल्यानंतर तिच्या तोंडात बोळा घालून व गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. शरीराच्या बाह्य भागांवर १६ तर अंतर्भागात ९ गंभीर जखमा आढळून आल्या आहेत.

मृत तरुणीच्या संपूर्ण शरीरावर जखमांच्या खुणा आहेत. डोके, ओठ, नाक, जबडा, हनुवटी, मान, डावा हात, खांदे, गुडघे, पाऊलांवरही जखमा आहेत. फुप्फुसांत रक्तस्राव झाल्याचेही समोर आले आहे. सामूहिक बलात्कार केल्याचा प्राथमिक अंदाजही अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. तिच्या गुप्तांगामध्येही इजा आढळून आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT