अरविंद केजरीवाल यांच्‍या प्रकृतीवरील वादावरुन दिल्‍लीचे नायब राज्‍यपाल व्‍ही. के. सक्‍सेना आणि आम आदमी पार्टीमध्‍ये पुन्‍हा एकदा जुंपली आहे.  File Photo
राष्ट्रीय

"ते डॉक्टर आहेत हे माहित नव्हते..."

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्‍लीतील कथित मद्य धोरण प्रकरणी कारागृहात असणारे दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्‍या प्रकृतीवरुन आम आदमी पार्टीने भाजपसह तिहार कारागृह प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्‍यान, दिल्‍लीचे नायब राज्‍यापल व्‍ही. के. सक्‍सेना यांनी दिल्लीच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या आहाराच्या सवयीवल काळजी व्‍यक्‍त केली आहे. त्‍यावर आम आदमी पार्टीने नायब राज्‍यपालांवर बोचरी टीका केली आहे.

नायब राज्‍यपालांनी व्‍यक्‍त केली केजरीवालांच्‍या प्रकृतीबाबत चिंता

दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी दिल्लीच्या मुख्य सचिवांना पत्रांत म्‍हट आहे की, कारागृह अधीक्षकांनी दिलेल्या अहवालात असे दिसून आले आहे की, केजरीवाल हे जाणूनबुजून वैद्यकीय शिफारसीपेक्षा कमी कॅलरी वापरत आहेत. या कमतरतेमुळे लक्षणीय वजन घटले आहे. टाइप-II डायबिटीज मेलिटसच्या त्याच्या ज्ञात वैद्यकीय इतिहासामुळे आरोग्याविषयी चिंता निर्माण झाली आहे," 7 जुलै रोजी केजरीवाल यांनी रात्रीच्या जेवणापूर्वी इन्सुलिनचा डोस नाकारला. अशा अनियमिततेमुळे आरोग्याच्या गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो. कोणत्याही संभाव्य वैद्यकीय संकटांना तोंड देण्यासाठी कठोर रक्तातील साखरेचे निरीक्षणावर भर द्यायला हवा." नायब राज्‍यपालांनी दिलेले निर्देश दिल्ली सरकारच्या गृह विभागालाही कळवण्यात आला आहे.

"ते डॉक्टर आहेत हे माहित नव्हते..."

नायब राज्‍यपालांच्‍या पत्राबाबत बोलताना दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, "माझ्या माहितीनुसार, दिल्‍लीचे नायब राज्‍यपाल साहेब एका सिमेंट कारखान्यात काम करायचे. ते आरोग्यविषयक समस्यांचे तज्ञ होते, ते डॉक्‍टर होते हे आम्‍हाला माहित नव्‍हते. त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही. अन्यथा आम्ही त्यांचे प्रतिज्ञापत्र वाचले असते."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT