Thalapathy Vijay Net Worth Pudhari
राष्ट्रीय

Thalapathy Vijay Net Worth: तामिळनाडूच्या राजकारणात धुमाकूळ घालणाऱ्या थलपथी विजयची संपत्ती किती? आकडा पाहून बसेल धक्का

Thalapathy Vijay Net Worth: थलपथी विजयने 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असल्याचा खुलासा केला आहे. चित्रपट, जाहिराती आणि गुंतवणुकीतून त्याला मोठे उत्पन्न मिळते.

Rahul Shelke

Thalapathy Vijay Net Worth: विजय उर्फ थलपथी विजय सध्या तमिळनाडूच्या राजकारणात चर्चेत आहे. चित्रपटसृष्टीत सुपरस्टार म्हणून ओळख निर्माण केल्यानंतर त्याने राजकारणात प्रवेश केला आणि आता निवडणुकांमध्येही त्याची जोरदार कामगिरी दिसून येत आहे. त्याच्या नेतृत्वाखालील Tamilaga Vettri Kazhagam (TVK) पक्षाला सुरुवातीच्या कलांमध्ये मोठी आघाडी मिळताना दिसत आहे.

विजयने 2024 मध्ये अभिनयातून निवृत्ती घेतल्यानंतर 2026 मध्ये राजकारणात पाऊल टाकले. त्याच्या लोकप्रियतेचा फायदा त्याला निवडणुकीतही होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, तो दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवत असून दोन्ही ठिकाणी तो आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

त्याच्या संपत्तीबाबत बोलायचे झाले, तर माहितीनुसार विजयची एकूण संपत्ती तब्बल 603 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. यामध्ये सुमारे 404 कोटी रुपयांची चल संपत्ती आणि जवळपास 198 कोटी रुपयांची अचल संपत्ती समाविष्ट आहे. विविध बँक खात्यांमध्ये 213 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा असल्याचेही त्याने नमूद केले आहे.

विजयची कमाई मुख्यतः चित्रपटांमधून होते. त्याशिवाय ब्रँड एंडोर्समेंट, जाहिराती, रिअल इस्टेट गुंतवणूक आणि इतर व्यवसायांमधूनही त्याला मोठे उत्पन्न मिळते. त्याची पत्नी संगीता यांच्या नावावरही सुमारे 15 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असल्याचे माहिती नमूद करण्यात आली आहे.

संपत्तीच्या बाबतीत आणखी एक विशेष बाब म्हणजे विजयच्या नावावर कोणतेही कर्ज किंवा देणी नाहीत. त्याच्या मालमत्तेमध्ये रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने आणि महागड्या वाहनांचा समावेश आहे. त्याच्याकडे सुमारे 883 ग्रॅम सोने आणि 15 लाख रुपयांचे चांदीचे दागिने आहेत.

लक्झरी कार्सचा शौक असलेल्या विजयच्या गॅरेजमध्ये BMW, Lexus, Toyota Vellfire आणि BMW i7 यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. याशिवाय चेन्नई आणि इतर ठिकाणी त्याची अनेक निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता आहे. कोडैकनाल येथेही त्याच्या नावावर शेतीची जमीन असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, विजय हा देशातील सर्वाधिक आयकर भरणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये त्याने सुमारे 184 कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केले होते.

एकूणच, चित्रपटातून कमावलेली लोकप्रियता, मजबूत आर्थिक स्थिती आणि राजकारणातील वाढती पकड यामुळे थलपथी विजय सध्या दक्षिण भारतात एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून पुढे येताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT