Tamil Nadu CM Vijay Pudhari
राष्ट्रीय

Tamil Nadu CM Vijay: तामिळनाडूत अखेर 'विजय' सरकार! आज मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी

तामिळनाडूमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा पेच अखेर शनिवारी सुटला.

मोहन कारंडे

Tamil Nadu CM Vijay

चेन्नई: तामिळनाडूमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा पेच अखेर शनिवारी सुटला. तमिळगा वेत्री कळघम या पक्षाला 'द्रमुक'चे मित्रपक्ष असलेल्या व्हीसीके आणि आययूएमएल यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यामुळे थलपथी विजय यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. विजय आज, रविवारी सकाळी १० वाजता तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. राज्यपालांनी त्यांना १३ मे पर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यपालांकडून नियुक्तीचे पत्र; १२१ आमदारांचे बळ

२३४ सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी ११८ आमदारांची आवश्यकता असताना, जोसेफ विजय यांनी १२१ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांना सुपूर्द केले. गेल्या चार दिवसांत राज्यपालांची ही चौथी भेट होती. पाठिंब्याची खातरजमा झाल्यानंतर राज्यपालांनी विजय यांची तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली.

जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर भव्य सोहळा

मुख्यमंत्रीपदाचा हा दिमाखदार शपथविधी सोहळा चेन्नईतील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सत्तेचे समीकरण जुळल्यानंतर आता सर्वांचे लक्ष १३ मे रोजी होणाऱ्या 'फ्लोर टेस्ट'कडे लागले आहे.

असे जुळले सत्तेचे गणित

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राजकीय अनिश्चितता निर्माण झाली होती. १०८ जागांसह 'टीव्हीके' हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता, मात्र बहुमतासाठी १० आमदारांची कमतरता होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT