TVK Election Thalapathy Vijay Pudhari
राष्ट्रीय

Vijay TVK government formation | तामिळनाडूमध्ये विजय यांनी गाठली 'मॅजिक फिगर'; vckच्या पाठिंब्यामुळे सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा

Vijay TVK government formation | व्हीसीके पक्षाच्‍या भूमिका वेधले होते सर्वांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

चेन्नई: तामिळनाडूमध्‍ये राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला असतानाच अभिनेते व टीव्‍हीके सर्वेसर्वा विजय यांच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. डाव्या पक्षांनंतर आता व्हीसीके (VCK) पक्षाने विजय यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे तामिळनाडूच्या सत्तेचे गणित अखेर जुळले असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

व्हीसीकेचा 'ई-मेल'द्वारे पाठिंबा

गेल्या काही तासांपासून व्हीसीके पक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर व्हीसीकेने आपली भूमिका स्पष्ट करत के. विजय यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, व्हीसीकेने अधिकृत ई-मेल पाठवून आपला पाठिंबा जाहीर केला. व्हीसीकेचे दोन आमदार असून, त्यांच्या या निर्णयामुळे विजय यांच्या गटाचे पारडे जड झाले आहे.

डावे पक्ष आणि व्हीसीकेची साथ

यापूर्वीच डाव्या पक्षांनी के. विजय यांना साथ देण्याचे जाहीर केले होते. डाव्यांच्या पाठिंब्यामुळे विजय विजयाच्या जवळ पोहोचले होतेच, मात्र व्हीसीकेच्या दोन आमदारांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा पूर्ण केला आहे.

व्‍हीसीकेने जाहीर केला बिनशर्त पाठिंबा

अभिनेता-राजकारणी विजय यांना तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठीचा शेवटचा अडथळा शनिवारी दूर झाला; जेव्हा 'VCK' पक्षाने 'TVK' ला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. दोन जागांवर विजय मिळवणाऱ्या 'VCK' पक्षाने, विजय आणि संपूर्ण तामिळनाडूलाच अनिश्चित राजकीय अवस्‍थेत ठेवले होते. गेल्या तीन दिवसांत राज्यपालांशी झालेल्या तिसऱ्या भेटीदरम्यानही विजय यांना सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेला किमान ११८ आमदारांचा पाठिंबा सिद्ध करता आला नव्हता.

विजय यांनी गाठला बहुमताचा आकडा

विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने १०८ जागांवर विजय मिळला आहे. काँग्रेस ५, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) २, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) २ आमदारांनी यापूर्वीच त्‍यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आता २ जागांवर निवडणूक जिंकलेल्‍या विदुथलाई चिरुथाईगल कात्ची (VCK) पक्षानेही बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्‍याने एकूण ११९ जागांच्या या गणितात विजय यांच्या पक्षाने अखेर बाजी मारल्‍याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT