Tamil Nadu Paternity Leave: तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी राज्यातील पुरूष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबरी दिली आहे. विजय यांच्या एका निर्णयामुळे पहिल्यांदाच राज्यातील सरकारी नोकरीत असलेल्या पुरूषांना पॅटर्निटी लीव्ह मिळणार आहे. आता पुरूष कर्मचाऱ्यांना १५ दिवसांची पॅटर्निटी सुट्टी मिळणार आहे.
पुरूष कर्मचाऱ्यांना ही १५ दिवसाची सुट्टी मुलाच्या जन्माआधी किंवा मुलाच्या जन्मानंतर सहा महिन्यात कधीही घेता येणार आहे. सरकारने याची अधिकृत घोषणा आज केली आहे.
पुरूष सरकारी कर्मचाऱ्यांकडून पॅटर्निटी सुट्टी मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. तमिळनाडूमध्ये महिला सरकारी कर्मचाऱ्यांना सध्याच्या घडीला ३६५ दिवस दिवसांची मॅटर्निटी लीव्ह आहे.