अभिनेते आणि 'तमिळगा वेत्री कळघम' पक्षाचे सर्वेसर्वा विजय यांनी आज (दि. २९) आपल्या पक्षाच्या उमेदवारांची घोषणा केली. 
राष्ट्रीय

Tamil Nadu Assembly Elections | अभिनेते विजय यांच्‍या 'TVK'चा सत्ताधारी 'द्रमुक'विरुद्ध थेट सामना, उमेदवारांची केली घोषणा

Vijay TVK Tamil Nadu | बेरोजगार तरुणांना भत्ता, वीज बिल सवलतीसह आश्वासनांचा पाडला पाऊस

पुढारी वृत्तसेवा

Tamil Nadu Assembly Elections 2026

चेन्नई: अभिनेते आणि 'तमिळगा वेत्री कळघम' पक्षाचे सर्वेसर्वा विजय यांनी आज (दि. २९) आपल्या पक्षाच्या उमेदवारांची घोषणा केली. विजय हे तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवणार आहेत.

'जनता आघाडी' विरुद्ध 'डीएमके' सामना होईल

विजय म्हणाले, "जनतेच्‍या प्रश्‍नांची उत्तरे देतील, अशा लोकांना उमेदवारी दिली आहे. मी तुमच्यासाठी सर्व काही सोडले, तसेच हे उमेदवार मी तुम्हाला सोपवत आहे. कृपया आम्हाला एक संधी द्या," असे आवाहन करताना ही निवडणूक केवळ आमच्यात आणि मुख्‍यमंत्री स्‍टालिन यांच्‍या द्रमुकमध्ये आहे. त्यांची राजकीय युतीही एक तडजोड आहे. आमचे उमेदवार हे सामान्य पार्श्वभूमीतून आले असून ते सर्वसामान्यांचे प्रश्न जाणतात, असा दावाही त्यांनी केला.

मतदारांवर आश्वासनांचा पाऊस

यावेळी विजय यांनी बेरोजगार तरुणांसाठी अनेक 'गॅरंटी' जाहीर केल्या आहेत. यामध्ये नोकरी नसलेल्या २९ वर्षांवरील व्यक्तींना दरमहा ४,००० रुपयांचे अनुदान, डिप्लोमा धारकांसाठी दरमहा २,५०० रुपये, इयत्ता १२ वी ते पीएचडीपर्यंतच्या शिक्षणासाठी २० लाख रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज, आदींचा समावेश आहे. तसेच तमिळ एम्प्लॉयमेंट क्रेडिट सिस्टम: ज्या खासगी कंपन्या ७५% स्थानिक लोकांना रोजगार देतील, त्यांना एसजीएसटीमध्ये २.५% सूट आणि वीज बिलात ५% कपात दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

स्वच्छ प्रशासनाचा नारा

मतदारांना आवाहन करताना विजय म्हणाले, "आम्ही सार्वजनिक पैशाचा कधीही गैरवापर करणार नाही किंवा भ्रष्टाचारात अडकणार नाही. महिलांची सुरक्षा, ड्रग्जमुक्त तामिळनाडू आणि कडक कायदा व सुव्यवस्था आम्ही सुनिश्चित करू," अशी ग्वाही देत मतदारांनी 'टीव्हीके'च्या शिट्टी या चिन्हाला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले.

पक्षातील कोअर टीमला महत्त्वाच्या जागा

अभिनेते विजय यांनी 'तमिळगा वेत्री कळघम'च्या उमेदवारांची यादीही जाहीर केली. चेन्नईतील पेरांबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व या दोन जागांवरून "सी. जोसेफ विजय" निवडणूक लढवतील, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना विजय यांनी त्यांच्या कोअर टीममधील विश्वासू नेत्यांना महत्त्वाच्या मतदारसंघांतून उमेदवारी दिली आहे. यामध्ये एन. आनंद: टी. नगर, व्यंकट रमण: मायलापूर, आदव अर्जुन: विल्लीवाक्कम, के. ए. सेंगोट्टयन: गोबीचेत्तीपलायम, के. जी. अरुणराज: तिरुचेंगोडे, सीटीआर निर्मल कुमार: तिरुप्परनकुंद्रम, जेसीडी प्रभाकर: थाउजंड लाईट्स, व्ही. एस. बाबू: कोलाथूर, डॉ. मारिया विल्सन: आर. के. नगर यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT