प्रातिनिधिक छायाचित्र. file photo.
राष्ट्रीय

Tamil Nadu Assembly Election | तामिळनाडूत 'अण्णाद्रमुक'च मोठा भाऊ, भाजप २३४ पैकी केवळ २७ जागांवर निवडणूक लढविणार!

Tamil Nadu Assembly Election | विधानसभा निवडणुकीसाठी रालोआचे जागावाटप निश्चित: २३४ पैकी अण्णाद्रमुक १७८ जागा लढविणार

पुढारी वृत्तसेवा

Tamil Nadu Assembly Election 2026

चेन्‍नई : तमिळनाडूमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) आपला जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. एकूण २३४ मतदारसंघांपैकी अण्णाद्रमुक १७८ जागांवर, तर भाजप २७ जागांवर निवडणूक लढवणार आहे. आघाडीतील इतर घटक पक्षांनाही जागांचे वाटप करण्यात आले असून, यात PMK ला १८ आणि एएमएमकेला ११ जागा देण्यात आल्या आहेत.

आघाडीत सर्व काही आलबेल: ई. पलानीस्वामी

अण्णाद्रमुकचे नेते एडप्पाडी के. पलानीस्वामी यांनी सांगितले की, आघाडीतील चर्चा अत्यंत सुरळीत पार पडली असून जागांच्या संख्येवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. इतर काही पक्षांशी अद्याप चर्चा सुरू असून त्यांच्या जागांची घोषणा लवकरच केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्टॅलिन यांना दिल्ली दौऱ्याची भीती

भाजपसोबतच्या युतीवर भाष्य करताना पलानीस्वामी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, "जेव्हा आम्ही दिल्लीला जातो, तेव्हा आमच्याबद्दल जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जातात. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांना आमच्या दिल्ली दौऱ्याची भीती वाटते." आघाडी असणाऱ्या पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना भेटणे ही सामान्य बाब आहे.

२७ जागांबाबत आम्ही अत्यंत समाधानी : पीयूष गोयल

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे तामिळनाडू निवडणूक प्रभारी पीयूष गोयल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "आम्ही सर्वजण एकच कुटुंब आहोत आणि आम्ही निवडणूक जिंकण्यासाठीच लढू... आम्हाला मिळालेल्या २७ जागांबाबत आम्ही अत्यंत समाधानी आहोत; आम्ही या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवू, कारण राज्यातील जनता मुख्यमंत्री स्टॅलिन आणि उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना कंटाळली आहे. राज्यात एनडीएचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT