Suspected Lashkar terrorist  File Photo
राष्ट्रीय

Suspected Lashkar terrorist | पहलगाम हल्ल्यामागील 'त्या' संशयित दहशतवाद्याचा मृत्यू कसा झाला?

तरुणाचा कोठडीत मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप, पोलिसांनी दिले मृत्यू कसा झाला याचे उत्तर

मोनिका क्षीरसागर

जम्मू-काश्मीर : जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम येथील एका २३ वर्षीय तरुणाला दहशवादी संबंधांबद्दल चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान ते अटकेतून पळ काढत असताना ओढ्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तर संबंधित तरुणाच्या कुटुंबियांनी कोठडीत मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

इम्तियाज अहमद असे या मृत तरुणाचे नाव असून, तो लष्कर-ए-तोयबाच्या स्लीपर सेलचा सदस्य असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला ओळख पटविण्यासाठी एका लपण्याच्या ठिकाणी नेण्यात आले होते, परंतु तो पळून जाण्याच्या प्रयत्नात वेगाने वाहणाऱ्या वैशो ओढ्यात उडी मारून बुडाला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २३ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यातील तपासादरम्यान इम्तियाजची भूमिका समोर आली आहे. जिथे सुरक्षा दलांशी झालेल्या थोड्या वेळासाठी झालेल्या गोळीबारानंतर दोन दहशतवादी पळून गेले. पोलिस सूत्रांचा असाही दावा आहे की, इम्तियाजने चौकशीदरम्यान दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांची माहिती असल्याची कबुली दिली होती, त्यानंतर त्याला त्याने दिलेल्या ठिकाणी नेण्यात आले. याचवेळी त्याने पळून जाण्यासाठी वैशो ओढ्यात उडी मारली आणि तो बुडाला, असे पोलिसांनी सांगितले. इम्तियाज वेगाने ओढ्यात उडी मारत वाहून जात असल्याचे ड्रोन फुटेज जारी केले आहे.

हमदच्या कुटुंबाने पोलिसांच्या या विधानाला जोरदार विरोध केला आहे, त्यांनी या घटनेत फसवणूक केल्याचा आरोप केला आहे आणि अधिकाऱ्यांवर कोठडीत हत्या केल्याचा आरोप केला आहे. या घटनेची तुलना पूर्वीच्या एका घटनेशी केली जात आहे जिथे कुलगाममधील तीन बेपत्ता गुज्जर तरुणांचे मृतदेह वैशो ओढ्यातून सापडले होते. त्या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे.

'या' घटनेमुळे गंभीर प्रश्न निर्माण होतायत

या संशयास्पद मृत्यूमुळे केंद्रशासित प्रदेशात व्यापक संताप निर्माण झाला आहे आणि राजकीय नेत्यांनी जबाबदारीची मागणी केली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, या घटनेमुळे गंभीर प्रश्न निर्माण होतात आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या कथित गैरप्रकारावर भर दिला जातो. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, "जर हिंसाचाराची एकच घटना संपूर्ण व्यवस्थेला हादरवून टाकू शकते, ज्यामुळे मनमानी अटक, घरे पाडणे आणि निष्पाप नागरिकांना लक्ष्य केले जाऊ शकते, तर गुन्हेगारांनी त्यांचे उद्दिष्ट आधीच साध्य केले आहे".

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT