राज्यातील मविआ खासदारांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली  (X Photo)
राष्ट्रीय

Maharashtra Politics | विधानसभेत रम्मी खेळणारा, सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्री राज्याला नको : खा. सुप्रिया सुळे

Supriya Sule on Manikrao Kokate | कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, राज्यातील मविआ खासदारांची केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे मागणी

पुढारी वृत्तसेवा

Supriya Sule on Maharashtra Agriculture Minister Manikrao Kokate

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे करण्यात आली. सुप्रिया सुळे यांच्यासह महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या खासदारांनी शिवराज सिंह चव्हाण यांची भेट घेत ही मागणी केली. तर विधानसभेत रम्मी खेळणारा, सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्री राज्याला नको, अशा शब्दांत आपल्या भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्यासमोर मांडल्या.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, बजरंग सोनवणे, धैर्यशील मोहिते पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत, काँग्रेसचे कल्याण काळे, शामकुमार बर्वे, प्रतिभा धानोरकर, विशाल पाटील यांचा समावेश होता.

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या की, महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची आज भेट घेतली. याप्रसंगी महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारे कृषीमंत्री राज्याला नको आहेत. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने वादग्रस्त विधाने आणि वर्तणूकीमुळे चर्चेत आहेत.

शेतकऱ्यांना अरेरावी करण्याचा प्रसंग असो की कर्जमाफीच्या संदर्भात केलेले विधान असो, त्यांनी आपल्या विधानांमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम केले आहे. त्यांच्या या असंवेदनशील वागण्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान तर होत आहेच तसेच राज्याच्या उज्ज्वल परंपरेला धक्का देखील बसत आहे. म्हणूनच त्यांचा तातडीने राजीनामा घेऊन त्यांच्याऐवजी संवेदनशील आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा संवेदनशील कृषीमंत्री महाराष्ट्राला द्यावा, अशी मागणी केली, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT