SC On municipal council election: नागपूर खंडपीठानं नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांचे निकाल हे एकाच दिवशी म्हणजे २१ डिसेंबरला जाहीर करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या या निकालाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. याबाबत आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं नगरपालिका आणि नगरपरिषदांचे निवडणूक निकाल लवकर जाहीर करण्यास नकार दिला आहे.
त्यामुळं आता पुढे ढकलण्यात आलेल्या नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणूक मतदान २० डिसेंबर आणि सर्व नगरपालिका नगरपरिषदांची एकत्रित मतमोजणी ही २१ डिसेंबर रोजी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयानं आजच्या सुनावणीवेळी कोणत्याही निवडणुका प्रलंबित राहू नये. उच्च न्यायालयानं ३१ जानेवारी या मूळ मुदतीच्या आता सर्व निवडणुका होतील हे पहावे असं देखील म्हटलं आहे.
याचबरोबर सर्वोच्च न्यायालयानं २० तारखेला मतदान होणाऱ्या नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुका काही कराणास्तव झाल्या नाहीत तर २ तारखेला मतदान झालेल्या निवडणुकांची मतमोजणी होणार असल्याचं देखील सांगितलं. तसंच सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयात कितीही याचिका असल्या तरी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या मुदतीत निवडणूक झाली पाहिजे असं देखील सांगितलं.
21 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 24 नगरपरिषद व नगरपालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी एकत्रित घेण्याचे आदेश दिले होते. यामुळे 3 डिसेंबरला होणारी मतमोजणी पुढे ढकलण्यात आली होती.
या निर्णयाविरोधात राजकिरण बरवे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. आधीच पार पडलेल्या निवडणुकांचा निकाल तात्काळ जाहीर करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. त्यानुसार या प्रकरणाची सुनावणी आज सकाळी 11 वाजता सुप्रीम कोर्टात झाली.