Appoinded two Judges in  Supreme Court
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून दोन नव्या न्यायमूर्तींची नियुक्ती मंगळवारी करण्यात आली.  Pudhari News Network
राष्ट्रीय

Supreme Court | सर्वोच्च न्यायालयात २ नव्या न्यायमूर्तींची नियुक्ती

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून दोन नव्या न्यायमूर्तींची नियुक्ती मंगळवारी (दि.१६) करण्यात आली. राष्ट्रपतींनी एन. कोटीश्वर सिंह आणि आर. महादेवन यांच्या नियुक्तीला मंजुरी दिल्यानंतर सरकारतर्फे घोषणा करण्यात आली. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन या नियुक्तीबद्दल माहिती दिली.

Summary

  • सर्वोच्च न्यायालयात दोन नव्या न्यायमूर्तींची नियुक्ती

  • राष्ट्रपतींकडून एन. कोटीश्वर सिंह आणि आर. महादेवन यांच्या नियुक्तीला मंजुरी

  • कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांची ‘एक्स’वर माहिती

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३४

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड दोन नव्या न्यायमूर्तींना शपथ देतील. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३४ होईल. न्यायामूर्ती एन. कोटीश्वर सिंह हे जम्मू आणि काश्मीरचे मुख्य न्यायाधीश आहेत. या नव्या नियुक्तीनंतर ते सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेले मणिपूरचे पहिले न्यायाधीश ठरले आहेत. तर न्यायमूर्ती आर. महादेवन हे सध्या मद्रास उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश आहेत.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश अनिरुद्ध बोस आणि न्यायाधीश ए. एस. बोपण्णा यांच्या निवृत्तीनंतर दोन जागा रिक्त झाल्या होत्या. त्या जागांवर न्यायाधीश म्हणून ही नियुक्ती करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT