Strait of Hormuz Attack pudhari
राष्ट्रीय

Strait of Hormuz Attack: होर्मुझमधील जहाजावरील हल्ल्यानंतर दोन भारतीय बेपत्ता; भारताचा कडक शब्दात निषेध

व्यावसायिक जहाजावर स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये ११ ऑक्टोबर २०२६ रोजी ड्रोनने हल्ला करण्यात आला.

Anirudha Sankpal

Strait of Hormuz Attack: भारताने सोमवारी भारतीय नागरिक असलेल्या जहाजावर स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. या हल्ल्यात जहाजावरील दोन भारतीय नागरिक बेपत्ता झाले आहेत.

भारताने, 'व्यावसायिक जहाजावर स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये ११ ऑक्टोबर २०२६ रोजी ड्रोनने हल्ला करण्यात आला. एमटी पेट्रो डॉल्फिन असं हल्ला झालेल्या जहाजाचे नाव असून यावर ११ भारतीय नागरिक कर्मचारी होते. त्यातील दोन कर्मचारी बेपत्ता झाले आहेत. याचबरोबर MT VALTHERA या जहाजावर देखील हल्ला झाला असून त्यावरील सर्व भारतीय कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे.'

मस्कत मधील भारतीय दूतावासाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की ते परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहेत. तसेच ओमानी प्रशासनासोबत देखील समन्वय साधून काम करत आहेत. शिप मॅनेजमेंट कंपनी सोबत देखील बेपत्ता भारतीय खलाशांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तसेच जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्यांना शक्य ती सर्व मदत करण्यात येत आहे.

मस्कत मधील भारतीय दूतावास पुढे म्हणते की, 'भारतीय खालाश्यांची सुरक्षा आणि संरक्षण ही भारतीय सरकारची प्राथमिकता आहे. व्यावसायिक जहाजांवर या भागात होत असलेले हल्ले ही अत्यंत काळजीची गोष्ट आहे. आधीच अस्थिर असलेले वातावरण अजूनच चिघळण्याची देखील भीती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT