SSC CGL 2025 Answer Key
नवी दिल्ली: स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) आज कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल (सीजीएल) परीक्षा २०२५ टियर १ साठी तात्पुरती उत्तरपत्रिका जाहीर करण्याची शक्यता आहे. Staff Selection Commission ही उत्तरतालिका आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करेल. देशातील १२६ शहरांमधील २५५ केंद्रांवर १३.५ लाख उमेदवारांनी ही परिक्षा दिली होती.
उमेदवारांना तात्पुरत्या उत्तरतालिकेमध्ये चुकीच्या उत्तरांवर हरकत नोंदवण्याची संधी मिळेल. आक्षेप वैध पुराव्यासह नोंदवणे आवश्यक आहे. SSC ने सांगितले आहे की, विषय विशेषज्ञ प्रत्येक आक्षेपाचे कठोरपणे पुनरावलोकन करतील, त्यानंतर अंतिम उत्तरतालिका जाहीर होईल, जी निवड प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी महत्त्वाची असेल.
SSC CGL उत्तरतालिका २०२५ अधिकृत वेबसाइटवरून डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांनी खालील पायऱ्या वापरू शकतात:
ssc.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
उजवीकडे वर असलेल्या Login बटणावर क्लिक करा.
SSC OTR ID आणि Password टाकून लॉगिन करा.
Exam Dashboard → SSC CGL 2025 निवडा.
Answer Key लिंकवर क्लिक करून डाउनलोड करा.
हरकत फक्त ऑनलाइन (ssc.gov.in) सादर करता येईल.
ssc.gov.in/digialm या वेबसाइटवर जाऊन हरकत नोंदवा.
प्रत्येक प्रश्नासाठी 50 रूपये शुल्क आकारले जाईल.
जर हरकत योग्य ठरली तर आयोग तुमचे शुल्क परत करेल.