Spicejet Flights Cancelled pudhari
राष्ट्रीय

Spicejet Flights Cancelled: स्पाईस जेटची उड्डाणे रद्द, शेकडो प्रवाशांचे प्रचंड हाल, तासंतास थांबूनही माहिती मिळेना

Spicejet Flights Cancelled: एअरलाईन्सच्या उड्डाणाचे संचालन पूर्णपणे प्रभावित झालं असून याचा फटका प्रवाशांना बसला आहे.

Anirudha Sankpal

Spicejet Flights Cancelled: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या स्पाईस जेटच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एअरलाईन्सच्या उड्डाणाचे संचालन पूर्णपणे प्रभावित झालं असून याचा फटका प्रवाशांना बसला आहे. मुंबई एअरपोर्टवर मंगळवारी सायंकाळी ७ वाजता स्पाईस जेटची एकही फ्लाईट टेकऑफ झाली नाही. यामुळे शेकडो प्रवाशी एअरपोर्टवर अडकून पडले. अनेक तास वाट पाहिल्यानंतरही प्रवाशांना फ्लाईन कधी रवाना होणार याची माहिती मिळाली नाही. चिडलेल्या प्रवाशांनी एअरलाईनच्या काऊंटरवर दंगा करून घोषणाबाजी केली.

मुंबई विमानतळावर गोंधळ

मुंबई एअरपोर्टच्या टर्मिनल १ वर स्पाईस जेटच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. प्रवाशांना एअरलाईनकडून विमानांची उड्डाणे कधी सुरळीत होणार याची स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. एवढंच काय तर तर या उड्डाणाची नवीन वेळ देखील स्पष्टपणे सांगण्यात आली नाही. त्यामुळं स्पाईस जेटच्या काऊंटरवर प्रवाशांची गर्दी झाली. खूप वाट पहावी लागत असल्यामुळं प्रवाशी चिडलेले दिसले. रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी रवाना होणाऱ्या फ्लाईटचे देखील बोर्डिंग सुरू झाले नाही. उड्डाणांची वाट पाहत असलेल्या प्रवाशांमध्ये हे कधी सुरळीत होणार याबाबत संभ्रम कायम होता.

दुबईवरून येणाऱ्या ४ फ्लाईट्स रद्द

स्पाईसजेटची अडचण फक्त मुंबई विमानतळावर मर्यादित नव्हती तर गेल्या काही दिवसांपासून एअरलाईनचे संचालन सारखं प्रभावित होत आहे. रविवारी एअरलाईन्सच्या दुबईवरून येणारी चार विमाने रद्द केली होती. याचे कारण दुबई एअरपोर्टवरील ग्राऊंड हँडलिंगचे काम पाहणाऱ्या कंपनी डनाटाकडून स्पाईस जेट चेक इन सर्व्हिस थांबवणे हे सांगण्यात आले होते.

स्पाईस जेटकडे डनाटाची १.४ कोटी युएई दिरहम पेक्षा जास्त थकबाकी असल्याचं कारण सांगण्यात येत आहे. हे पेमेंट झाले नाही म्हणून दुबई एअरपोर्टवर स्पाईसजेटची चेक इन सर्व्हिस थांबवली होती.

स्पाईस जेटला ६२१ कोटींचा तोटा

स्पाईस जेटच्या आर्थिक स्थितीवर नजर टाकली तर सप्टेंबर २०२५ मध्ये संपलेल्या क्वार्टरमध्ये कंपनीला ६२१ कोटींचा निव्वळ तोटा झाला होता. एका वर्षापूर्वी याच काळात कंपनीला ४५८ कोटी रूपये लॉस झाला होता. याकाळात कंपनीचा वर्षाचे उत्पन्न देखील १३.४ टक्क्यांनी घसरून ७९२ कोटी रूपये राहिलं आहे. यापूर्वी हे उत्पन्न ९१५ कोटी रूपये होते. कंपनीला या क्वार्टरमध्ये २९७ कोटी रूपयांचा ऑपरेटिंग लॉस झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT