केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुन्नारमधून भाजपच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या 'सोनिया गांधी' या सध्याच्या चर्चेचा केंद्रबिंदू आहेत.  
राष्ट्रीय

Sonia Gandhi BJP : 'सोनिया गांधी' भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? जाणून घ्‍या काय आहे प्रकरण?

नाव साधर्म्यमुळे केरळमधील मुन्‍नारमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीकडे वेधले सर्वांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

Sonia Gandhi Namesake : केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुन्नारमधून भाजपच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या 'सोनिया गांधी' या सध्याच्या चर्चेचा केंद्रबिंदू आहेत. काँग्रेसच्‍या माजी अध्‍यक्षांच्‍या नाव साधर्म्यमुळे स्‍थानिकांचे या निवडणुकीकडे लक्ष वेधले आहे. भाजपच्‍या उमेदवाराचे माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी त्यांचे नाव जुळत असले तरी, त्यांचा राजकीय प्रवास पूर्णपणे वेगळा आहे.

सोनिया गांधी नाव कसे ठेवले?

सोनिया गांधी यांची दिवंगत वडील दुरे राज हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. सोनिया गांधी यांच्याबद्दल असलेल्‍या आदरातून यांनी आपल्या नवजात कन्येचे नाव सोनिया गांधी ठेवले होते. विवाहानंतर सोनिया यांचा विवाह भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आणि विद्यमान पंचायत सरचिटणीस सुभाष यांच्‍याशी झाला. त्‍यांनी दीड वर्षांपूर्वी जुन्या मुन्नार मुळक्कडा प्रभागातील पोटनिवडणूक लढवली होती. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत सोनिया गांधी भाजप-समर्थित उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्‍यामुळे ही स्थानिक निवडणूक लक्षवेधी ठरली आहे.

नाव समान असल्‍याने मतदारांमध्‍ये गोंधळाची शक्‍यता

मुन्नारमधून काँग्रेसच्या उमेदवार मंजुळा रमेश यांच्यासमोर आता एक अनोखे आव्हान उभे राहिले आहे: त्यांच्या मुख्य प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार 'सोनिया गांधी' आहेत, ज्यांचे नाव लगेच लोकांचे लक्ष वेधून घेणार आहे. नावे समान असल्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ होण्याची आणि मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. हा मुद्दा अटीतटीच्या पंचायत निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो, म्हणून काँग्रेसच्या उमेदवाराची चिंता वाढली आहे. दरम्‍यान, केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२५ मध्ये दोन टप्प्यांत, ९ आणि ११ डिसेंबर रोजी होणार आहेत, तर मतमोजणी १३ डिसेंबर रोजी होणार आहे.

काँग्रेसला चिंता का?

सोनिया गांधी नावाची महिलाच निवडणूक लढवत असल्‍याने काँग्रेसच्या उमेदवार मंजुळा रमेश यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, दक्षिण महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये तब्बल १७ महाविकास आघाडी आणि महायुती उमेदवारांना एकापेक्षा जास्त समान नावाच्या उमेदवारांचा सामना करावा लागला होता., सांगलीतील तासगाव येथे,राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार रोहित रावसाहेब पाटील निवडणुकीत पदार्पण करत होते, तिथे त्यांच्या विरोधात 'रोहित पाटील' नावाचे आणखी तीन उमेदवार रिंगणात होते. यामुळे आता सोनिया गांधी नावाची महिला भाजपकडून निवडणूक लढवत असल्‍याने काँग्रेसला चिंता वाटणे स्‍वाभाविकही आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT