राजघाट येथे महात्मा गांधींच्या समाधीला अभिवादन करताना सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि त्यांच्या पत्नी गीतांजली अंग्मो  
राष्ट्रीय

Sonam Wangchuk | महात्मा गांधींचा मार्ग आजही सुसंगत-सोनम वांगचुक : राजघाट समाधीस्थळी केले अभिवादन!

केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणे म्हणजे कोणत्याही प्रकारचे राजकीय समर्थन नाही

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सोमवारी राजघाट येथील महात्मा गांधींच्या समाधीला अभिवादन केले. यावेळी त्यांच्या पत्नी गीतांजली अंग्मो देखील उपस्थित होत्या. नुकत्याच पार पडलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या यशाने महात्मा गांधींच्या कार्यपद्धतीची सुसंगतता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे, असे यावेळी ते म्हणाले. केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणे म्हणजे कोणत्याही प्रकारचे राजकीय समर्थन नसून, केंद्र सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे ते लक्षण होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर वांगचुक म्हणाले की, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत २६ दिवसांचे उपोषण सोडल्याबद्दल झालेली टीका ही लडाखी परंपरांबद्दलच्या गैरसमजातून उद्भवली होती.

"मला बापूंच्या चरणी श्रद्धांजली वाहायची होती. त्यांचा मार्ग १०० वर्षांपूर्वी जितका महत्त्वाचा होता, तितकाच आजही आहे. हा प्रयोग आज यशस्वी ठरला आहे," असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT