सोनम वांगचुक  Pudhari
राष्ट्रीय

Sonam Wangchuk : आंदोलकांची सुटका करा... अन्‍यथा बेमुदत उपोषण आणि पदयात्रा : सोनम वांगचुक यांचा इशारा

परिस्थिती इतकी चिघळेल अशी अपेक्षा नव्हती

पुढारी वृत्तसेवा

Sonam Wangchuk Delhi protest warning : दिल्लीतील जंतर-मंतर येथे आज (दि. १० ऑक्टोबर) कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या आंदोलनास परवानगी नाकारली. दरम्यान, राजकीय तणावाच्या वातावरणात, दिल्लीतील जंतर-मंतर येथे नियोजित निदर्शनापूर्वी हजारो आंदोलकांसह अनेक नेत्यांना अटक करण्यात आली आहे. यासर्वांची तत्‍काळ सुटका करा, अन्‍यथा बेमुदत उपोषणासह पदयात्रा काढण्‍यात येईल, असा इशारा लडाखमधील पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

देशात "अघोषित आणीबाणी"सदृश परिस्थिती : सोनम वांगचुक

सोनम वांगचुक यांनी आरोप केला की, भारतात "अघोषित आणीबाणी"सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 'एक्स' (X) वरील एका पोस्टमध्ये वांगचुक यांनी म्‍हटलं आहे की, दिल्‍लीतील निदर्शनादरम्यान एकता आणि शांतता राखण्याचे आवाहन केले होते, परंतु परिस्थिती इतकी चिघळेल अशी अपेक्षा नव्हती. अटक करण्यात आलेल्यांची लवकरच सुटका होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. रविवार, ११ ऑक्‍टोबर रोजी आंदोलकांची सुटका न झाल्यास आपण बेमुदत उपोषण किंवा पदयात्रेचा विचार करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ममता बॅनर्जी, केजरीवाल आणि पी. विजयन यांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत शनिवारी राजधानीत विरोधी पक्षांमधील चार माजी मुख्यमंत्र्यांना ताब्यात घेतले आहे. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांना राजधानीत 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) आंदोलनात सहभागी होण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेण्यात आले.

ममतांसह तृणमूलच्‍या खासदारांचा आंदोलनात सहभाग

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना त्यांच्या पक्षाच्या अनेक खासदारांसह मध्य दिल्लीतील साउथ ॲव्हेन्यू येथून ताब्यात घेण्यात आले; पोलिसांनी अडवल्यानंतर त्या तिथे एका बस स्टँडवर आंदोलनासाठी बसल्या होत्या. बॅनर्जी आणि डेरेक ओ'ब्रायन व डोला सेन यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या पाच खासदारांना ताब्यात घेऊन पोलीस बसमधून नेण्यात आले. आंदोलनादरम्यान ममता बॅनर्जी यांनी आपल्या तोंडावर बँड-एड लावले होते.

इंडिया' आघाडी, लोकांचा आवाज बुलंद करण्यासाठी लढा सुरूच ठेवणार : ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी यांनी तोंडावर बँड-एड लावून निषेध नोंदवला. "सरकार आमच्याशी गैरवर्तन करत आहे," असे बॅनर्जी यांनी पोलीस बसमधून दिलेल्या व्हिडिओ निवेदनात म्हटले. "आम्ही, म्हणजेच 'इंडिया' (INDIA) आघाडी, लोकांचा आवाज बुलंद करण्यासाठी लढा सुरूच ठेवू," असेही त्या म्हणाल्या.

केजरीवाल घराबाहेर पडताच ताब्‍यात

अरविंद केजरीवाल, ज्यांच्या निवासस्थानाला सकाळपासूनच दिल्ली पोलिसांनी वेढा घातला होता, त्यांनाही आंदोलनात सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करताना ताब्यात घेण्यात आले.ताब्यात घेतल्यानंतर एका व्हिडिओ संदेशात केजरीवाल म्हणाले की, देशातील तरुण या कारवाईला घाबरत नाहीत. "भारतातील तरुण घाबरणार नाहीत. आम्ही मतांच्या चोरीविरुद्ध लढा देऊ. प्रत्येकाने बाहेर पडून निषेध केला पाहिजे," असे ते म्हणाले. दरम्‍यान, केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि सीपीएमचे खासदार जॉन ब्रिटास यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन छत्रसाल स्टेडियममधील डिटेंशन सेंटरमध्ये नेले. त्यांच्यासोबतच माणिक सरकार यांनाही आंदोलनादरम्यान ताब्यात घेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT