Shraddha Dubey File Photo
राष्ट्रीय

Shraddha Dubey: बहिणीसमोर कपडे काढायला लावले, अंगावर लिपस्टिक फासली; श्रद्धाच्या चौकशीतून शिवाच्या छळाबाबत धक्कादायक खुलासे

लखनौमधील करोडपती व्यावसायिक शिवा शर्मा यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मॉडेल श्रद्धा दुबे, तिची बहीण रश्मी दुबे आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या चौकशीत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Shraddha Dubey Case:

लखनौ: लखनौमधील करोडपती व्यावसायिक शिवा शर्मा यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मॉडेल श्रद्धा दुबे, तिची बहीण रश्मी दुबे आणि त्यांचा ड्रायव्हर तन्वीर अली यांची चौकशी सुरू असताना धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या दिवशी श्रद्धाने शिवाचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. त्याला अपमानित करण्यासाठी तिने त्याला कपडे काढायला भाग पाडले आणि त्याच्या संपूर्ण अंगावर लिपस्टिक फासली.

श्रद्धा, तिची बहीण रश्मी, त्यांचा जवळचा साथीदार आमिर आणि ड्रायव्हर दानिश यांनी मिळून शिवाला नाचायला लावले. या गटाने तासनतास त्याला अपमानित केले आणि त्याचा छळ केला, असा आरोप आहे. चौकशीदरम्यान, श्रद्धाने कबूल केले की ती शिवाचे शोषण करत होती आणि तो पूर्णपणे तिच्या नियंत्रणाखाली होता. इतकेच नव्हे तर, तिला त्याचे पाय चेपायलाही लावले जात असे. तिने शिवाचे काही आक्षेपार्ह व्हिडिओही रेकॉर्ड केले होते, ज्यांचा वापर करून ती त्याला ब्लॅकमेल करत असे.

श्रद्धा आणि तिचे साधीदार वारंवार हुक्का बारमध्ये जायचे

आपला प्रभाव दाखवण्यासाठी आणि इतरांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी, श्रद्धा शिवाला उच्चपदस्थ अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्तींसोबतचे तिचे फोटो दाखवत असे; हे फोटो एका पेन ड्राइव्हमध्ये साठवलेले होते. सूत्रांनुसार, श्रद्धा या प्रभावशाली व्यक्तींच्या नावाचा वापर करून इतरांना धमकावत असे. तिने या प्रभावाचा वापर करून हजरतगंज पोलीस ठाण्यात एफआयआर सुद्धा नोंदवून घेतला होता.

तपासातून असे समोर आले आहे की, श्रद्धा आणि तिचे साथीदार दररोज रात्री विभूती खंड येथील किसान बाजारातील एका कॅफेमध्ये जात असत. तिथे हुक्का ओढत असताना, ते श्रीमंत कुटुंबांतील व्यक्तींना लक्ष्य करण्याची योजना आखत असत. याच कॅफेमध्ये श्रद्धाची पहिली भेट शिवा शर्माशी झाली होती. श्रद्धाने सोशल मीडियावर पोस्ट केलेले अनेक फोटो याच कॅफेमधील असल्याचे मानले जात आहे.

हत्येच्या घटनेनंतर कॅफे मालक फरार

श्रद्धा आणि तिच्या साथीदारांच्या अटकेनंतर, कॅफे मालकाने आपले दुकान बंद केले आणि तो पळून गेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आमिर, ज्याच्यावर शिवाचा छळ केल्याचा आणि घटनेनंतर त्याला नेपाळला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे, तो देखील अद्याप फरार आहे. या प्रकरणाच्या संदर्भात अटक करण्यात आलेले श्रद्धा दुबे, रश्मी दुबे आणि तन्वीर अली हे मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले. न्यायालयाने तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडी १३ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.

श्रद्धाने जेलमध्ये असताना आपल्या वकिलाला भेटण्यासाठी दर आठवड्याला अधिक वेळ मिळावा, अशी विनंती केली. तिने स्वतः प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचीही मागणी केली, परंतु या मागणीमागचे कारण विचारले असता ती गप्प राहिली. न्यायालयाने स्पष्ट केले की, केवळ आवश्यक वाटल्यासच श्रद्धाला न्यायालयात आणले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT