Shillong MP Ricky A J Syngkon Dies Playing Football Pudhari
राष्ट्रीय

Ricky A J Syngkon: फुटबॉल खेळताना मैदानातच कोसळले; खासदाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, मेघालयमध्ये शोककळा

Shillong MP Dies Playing Football: शिलांगचे खासदार फुटबॉल खेळताना अचानक कोसळले आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी जीव वाचवण्याचे प्रयत्न केले, मात्र त्यांना वाचवता आलं नाही.

Rahul Shelke

Shillong MP Ricky A J Syngkon Dies Playing Football: मेघालयची राजधानी शिलाँग येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. खासदार रिकी ए. जे. सिंगकोन यांचं फुटबॉल खेळताना अचानक निधन झालं. वयाच्या अवघ्या 54व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली आणि संपूर्ण राज्यात शोककळा पसरली.

मावलाई मावियोंग परिसरात मित्रांसोबत एक फ्रेंडली फुटबॉल सामना खेळत असताना सिंगकोन अचानक मैदानावर कोसळले. उपस्थितांनी तात्काळ त्यांना मावियोंग कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये दाखल केलं. मात्र तिथे डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना डॉ एच गॉर्डन रॉबर्ट्स हॉस्पिटल येथे हलवण्यात आलं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्यांचा जीव वाचवता आला नाही.

सिंगकोन हे व्हॉइस ऑफ द पीपल पार्टीचे (VPP) प्रमुख नेते होते. त्यांच्या अचानक जाण्याने राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री प्रेस्टन तिनसॉन्ग, VPP प्रमुख आर्डेंट एम. बसायावमोइत यांच्यासह अनेक नेते रुग्णालयात दाखल झाले.

या दुःखद घटनेनंतर मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांनी ‘एक्स’वर शोक व्यक्त करत लिहिलं की, “शिलांगचे माननीय खासदार डॉ. रिकी ए. जे. सिंगकोन यांच्या अकाली निधनाने मला धक्का बसला आहे. ते एक समर्पित, संवेदनशील आणि जनतेसाठी मनापासून काम करणारे नेते होते. समाजासाठी काम करण्याची त्यांची तळमळ कायम स्मरणात राहील.”

लोकप्रिय असलेल्या या खासदाराच्या अचानक जाण्याने समर्थक, कार्यकर्ते आणि नागरिक सगळेच शोकाकुल आहेत. राज्याने एक सक्रिय, लोकाभिमुख नेता गमावला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT