Sharad Pawar : शरद पवारांनी राज्यसभेत यावे, सर्व पक्ष मदत करतील (File Photo)
राष्ट्रीय

Sharad Pawar : शरद पवारांनी राज्यसभेत यावे, सर्व पक्ष मदत करतील

राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आशावाद; दिल्लीत वाढदिनी पवारांना सर्वपक्षीय नेत्यांच्या शभेच्छा

पुढारी वृत्तसेवा

Sharad Pawar should come to Rajya Sabha, all parties will help

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुन्हा राज्यसभेत हवे आहेत. महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणाला त्यांची गरज आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदारांनी केले. सोबतच, त्यांच्यासाठी सर्व पक्ष, प्रसंगी आमचे विरोधकही त्यांना राज्यसभेत आणण्यासाठी मदत करतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. शरद पवार यांचा राज्यसभेतील कार्यकाळ एप्रिल २०२६ मध्ये पूर्ण होत आहे. त्यानंतर शरद पवार पुन्हा राज्यसभेवर येणार का, यासंदर्भातल्या चर्चांना उधाण आले आहे.

गुरुवारी शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. विविध पक्षांचे खासदार, राज्यातील राजकीय-सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना खासदार नीलेश लंके म्हणाले की, शरद पवार हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाचे आहेत. दरवर्षी साधारणपणे संसदेच्या अधिवेशनामुळे ते दिल्लीत असतात. अनेक लोक त्‍यांना शुभेच्छा द्यायला येत असतात.

शुक्रवारी ते मुंबईला असणार आहेत, त्यामुळे आम्हीदेखील आज भेटून शुभेच्छा दिल्या आहेत. बुधवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील कुटुंबाचा भाग म्हणून त्यांना शुभेच्छा द्यायला आले होते. यामध्ये राजकीय काहीही नव्हते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही, याबाबतचा निर्णय हा आमचा नसून वरिष्ठ पातळीवर घेतला जाणारा विषय आहे. कुठल्याही गोष्टीसंदर्भात शरद पवार जे सांगतील तेच आमचे धोरण असेल, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT