राम नारायण अग्रवाल Pudhari Photo
राष्ट्रीय

'अग्नी मॅन' म्हणून प्रसिद्ध असणारे शास्त्रज्ञ राम नारायण अग्रवाल यांचे निधन

84 व्या वर्षी हैदराबाद येथे घेतला अखेचा श्वास

करण शिंदे

प्रसिद्ध क्षेपणास्त्र शास्त्रज्ञ डॉ. राम नारायण अग्रवाल यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांना अग्नी क्षेपणास्त्रांचे जनक म्हणून ओळखले जाते. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थामध्ये ते अग्नी क्षेपणास्त्र शास्त्रज्ञ म्हणून कार्यकत होते. (DRDO) ने सांगितले की, शास्त्रज्ञ राम नारायण अग्रवाल यांचे हैदराबाद येथे निधन झाले.

अग्नी क्षेपणास्त्रांचे पहिले कार्यक्रम संचालक

देशातील लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमात डॉ.राम नारायण अग्रवाल यांची महत्त्वाची भूमिका होती. ते अग्नी क्षेपणास्त्रांचे पहिले कार्यक्रम संचालक होते. या कारणास्तव त्यांना 'अग्नी मॅन' म्हणूनही ओळखले जाते. अग्नी, इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल (ICBM) कार्यक्रमात भारताचा समावेश अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन, इस्रायल आणि उत्तर कोरिया या देशांच्या गटात झाला होता. 1989 मध्ये, डॉ. अग्रवाल आणि त्यांच्या टीमने, कार्यक्रम संचालक म्हणून, अग्नी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी उड्डाण केली.

हे एक मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र होते, जे ओडिशाच्या किनारपट्टीवरील बालासोर येथील चाचणी श्रेणीतून सोडण्यात आले होते. 1983 ते 2005 पर्यंत डॉ. अग्रवाल यांनी अग्नि मिशनचे कार्यक्रम संचालक म्हणून काम केले. यानंतर ते प्रगत प्रणाली प्रयोगशाळेचे (एएसएल) संचालक म्हणून निवृत्त झाले.

डीआरडीओच्या ज्येष्ठ, वर्तमान आणि माजी शास्त्रज्ञांनी डॉ अग्रवाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. डीआरडीओचे माजी प्रमुख आणि क्षेपणास्त्र शास्त्रज्ञ डॉ. जी. सतीश रेड्डी म्हणाले की, देशाने एक महान व्यक्तिमत्व गमावले आहे. ते म्हणाले की, देशातील लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या विकासात डॉ.अग्रवाल यांची महत्त्वाची भूमिका आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT