कोरोना रुग्णांसाठी DRDO चे 2-DG औषध पुढील आठवड्यात होणार लॉन्च

Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : डीआरडीओकडून (DRDO) विकसित कोविड रोधक औषध २-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-DG) चे १० हजार डोसची पहिली बॅच पुढील आठवड्याच्या सुरुवातीस लॉन्च केलं जाणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कोव्हिड रुग्णांसाठी २ डीजीचे १००० डोसची पहिला टप्पा पुढील आठवड्याच्या सुरुवातीला लॉन्च करण्याचे नियोजित आहे. त्यांनी सांगितलं की, अधिक कोरोना रुग्णांसाठी हे उपलब्ध होण्यासाठी आम्ही याची उत्पादन क्षमता वाढवत आहोत. हे औषध डीआरडीओच्या लॅब इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लियर मेडिसिन ॲण्ड अलाईड सायन्स (INMAS) ने हैदराबादच्य़ा डॉ. रेड्डी लेबोरेटरीसोबत मिळून तयार केलं आहे. २-डीजी औषध पावडरच्या रूपात पॅकेटमध्ये असेल, ही पावडर पाण्यात मिसळून पिण्यासाठी असेल. 

वाचा- Cyclone Tauktae : चक्रीवादळ आज कोकणावर धडकणार

याआधी शुक्रवारी, कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर यांनी बंगळुरुमध्ये डीआरडीओचा कॅम्पस दौरा केला. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, महामारीचा सामना करण्यासाठी DROD च्या प्रयत्नांविषयी माहिती देताना सांगितलं की, कशाप्रकारे २ डीजी औषध कोव्हिडविरोधात युद्धात गेम चेंजरची भूमिका साकारू शकते. कर्नाटकाच्या आरोग्य मंत्रालयाद्वारा जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये सुधाकर यांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, ''DRDO द्वारा विकसित २-डीजी महामारीशी लढण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका साकारू शकते. याशिवाय, सरकारने DRDO द्वारा विकसित 'ऑक्सीकेयर' १.५ लाख युनिट खरेदी करण्याची मंजुरीदेखील दिली आहे. ज्यामुळे कोव्हिड-१९ संक्रमित रुग्णांच्या उपचारासाठी मदद मिळेल. ऑक्सीकेयर SPO२ वर आधारित एक ऑक्सीजन सप्लाय सिस्टिम आहे. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ऑक्सीकेअर सिस्टम पीएम केअर फंडचा वापर करत 322.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली जाईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news