SBI ShutDown Service file photo
राष्ट्रीय

SBI ShutDown Service: SBI खातेधारकांसाठी अलर्ट! बँकेची 'ही' सुविधा १ डिसेंबरपासून कायमची बंद; कोट्यवधी ग्राहकांना बसणार फटका

SBI ग्राहक असाल तर लगेच वाचा! १ डिसेंबरपासून SBI ची महत्त्वाची सुविधा बंद होणार आहे. याचा तुमच्या आर्थिक व्यवहारांवर काय परिणाम होईल?

मोहन कारंडे

SBI ShutDown Service:

नवी दिल्ली: जर तुमचेही बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. एसबीआय बँक लवकरच एक मोठी सुविधा बंद करत आहे, ज्याचा परिणाम कोट्यवधी ग्राहकांवर होणार आहे. १ डिसेंबरपासून बँक कोणती सुविधा बंद करणार आहे, जाणून घ्या सविस्तर.

कोणती सेवा बंद होणार?

एसबीआयच्या ग्राहकांना १ डिसेंबर २०२५ पासून 'mCASH' ही सुविधा वापरता येणार नाही. बँकेने स्पष्टीकरण दिले आहे की, ३० नोव्हेंबर २०२५ नंतर mCASH द्वारे पैसे पाठवणे आणि ते क्लेम करणे ही सुविधा OnlineSBI आणि YONO Lite या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध राहणार नाही.

नेमकी काय आहे ही 'mCASH' सुविधा?

एसबीआयची mCASH सेवा ग्राहकांना जलद आणि सोप्या पद्धतीने पैसे पाठवण्याची सुविधा देत होती. या फीचरद्वारे, फक्त मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी वापरून देखील आर्थिक व्यवहार पूर्ण करता येत होता. हे फीचर विशेषतः लहान आणि तातडीचे पेमेंट करण्यासाठी उपयुक्त होते. मात्र, आता १ डिसेंबरपासून हे फीचर कायमस्वरूपी बंद केले जाणार आहे.

बँक ही सेवा का बंद करत आहे?

एसबीआयने आपल्या संकेतस्थळावर ही mCASH सेवा ३० नोव्हेंबर २०२५ नंतर उपलब्ध राहणार नसल्याची घोषणा केली आहे. याचे कारण mCASH हे जुने तंत्रज्ञान वापरून तयार केलेले होते. याऐवजी, ग्राहकांना UPI, IMPS, NEFT, आणि RTGS सारख्या अधिक आधुनिक आणि सुरक्षित पेमेंट पर्यायांचा वापर करण्याचा सल्ला बँकेने दिला आहे. डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित, जलद आणि विश्वसनीय बनवणे हे बँकेचे उद्दिष्ट आहे, म्हणूनच या नवीन डिजिटल प्लॅटफॉर्मला प्राधान्य दिले जात आहे.

१ डिसेंबरनंतर पैसे कसे ट्रान्सफर करायचे?

mCASH बंद झाल्यानंतर ग्राहक BHIM SBI Pay, IMPS आणि इतर डिजिटल माध्यमांचा वापर करून पैसे पाठवू शकतात. UPI द्वारे पैसे ट्रान्सफर करण्याची सोपी पद्धत:

  • BHIM SBI Pay ॲपमध्ये लॉगिन करा आणि 'Pay' हा पर्याय निवडा.

  • त्यानंतर VPA, अकाउंट-IFSC किंवा QR कोड यापैकी कोणताही एक पर्याय निवडून आवश्यक माहिती भरा.

  • पैसे ज्या खात्यातून ट्रान्सफर करायचे आहे, ते डेबिट अकाउंट निवडा आणि 'टिक मार्क' दाबा.

  • शेवटी, तुमचा UPI पिन टाका आणि तुमचे पेमेंट त्वरित पूर्ण होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT