SBI Cyber Attack: भारतीय स्टेट बँकेवर सायबर अटॅक झाला आहे. या माहितीला खुद्द SBI ने दुजोरा दिला आहे. SBI च्या सर्व्हरवर सायबर अटॅक झाला असून या अटॅकवेळी काही डेटा देखील चोरीला गेला आहे. बँकेने स्वतः सांगितलं की त्यांच्या ३९०० ग्राहकांची वैयक्तिक रेकॉर्डसची चोरी झाली आहे. जवळापस ४ हजार ग्राहकांची वैयक्तिक माहिती ही डार्क वेबवर शेअर करण्यात आली आहे.
एसबीआयने सांगितलं की लीक डिटेल्समध्ये ग्राहकांचे नाव, फोन नंबर, आयडी आणि कर्जाचे डिटेल्स यांचा समावेश आहे. बँकेने या सायबर अटॅकमुळे त्यांच्या कोअर ऑपरेशनवर किंवा आर्थिक कामगिरीवर कोणताही परिणाम झालेला नाही असं स्पष्ट केलं आहे.
एसबीआयने १६ ऑक्टोबर रोजी सांगितलं की त्यांना सरकारी एजन्सीद्वारे हॅकिंगचा अलर्ट मिळाला आहे. यात थ्रेट हा इंटेलिजेन्स सर्व्हिस प्रोव्हायडर, डिफेन्स सायबर एजन्सी आणि इंडिया कम्युटर इमर्जनसी रिस्पोन्स टीम यांचा समावेश होता.
एसबीआयने सांगितलं की सुरूवातीच्या तपासात जवळपास ३ लाख ७५ हजार रेकॉर्ड विश्लेषण करण्यात आलं आहे. त्यातील फक्त ३८९७ ग्राहकांचे रेकॉर्ड असे होते ज्यात वैयक्तिक माहिती होती. लीक इन्फॉर्मेशनमध्ये ग्राहकाचा रजिस्टर मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, जेंडर, ईमेल आणि घराचा पत्ता याचां समावेश होता.
एसबीआयने स्पष्ट केलं की बँकिंग आणि ग्राहकांवर या सायबर अटॅकचा काही परिणाम झालेला नाही. बँकिंग ऑपरेशन आधीसारखेच सुरळीत सुरू राहणार आहेत. तसेच ग्राहकांच्या डिटेल्स देखील सुरक्षित आहेत. तसेच ग्राहकांचे बँक अकाऊंट देखील सुरक्षित आहेत. एसबीआय ही भारताची सर्वात मोठी सरकारी बँक आहे.