SBI Clerk Recruitment 2025  (file photo)
राष्ट्रीय

SBI Clerk Recruitment 2025 | 'एसबीआय'मध्ये क्लर्कच्या ६,५८९ जागांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरु, जाणून घ्या पात्रता निकष आणि अर्ज कसा करावा?

SBI नं SBI Clerk पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे

दीपक दि. भांदिगरे

SBI Clerk Recruitment 2025

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून ज्युनियर असोसिएट्स- कस्टमर सपोर्ट अँड सेल्स (SBI Clerk) पदांसाठी आज ६ ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एसबीआयमध्ये ज्युनियर असोसिएट पदाच्या ६,५८९ रिक्त जागा आहेत. एसबीआय क्लर्क पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ ऑगस्ट आहे.

SBI Clerk पदासाठी पात्रता काय हवी?

वयोमर्यादा : इच्छुक उमेदवारांचे वय १ एप्रिल २०२५ रोजी २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. याचाचा अर्थ असा की उमेदवारांचा जन्म २ एप्रिल १९९७ आधी आणि १ एप्रिल २००५ नंतर (दोन्ही दिवसांचा समावेश) झालेला नसावा. राखीव श्रेणीतील उमेदवारांना नियमांनुसार वयोमर्यादेत सूट मिळेल.

क्लर्क पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी अथवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. जे पदवी शिक्षणाच्या अंतिम वर्षात आहेत अथवा सेमिस्टर करत आहेत; त्यांनादेखील या पदांसाठी तात्पुरते अर्ज करता येतात. जर त्यांची निवड झाली तर त्यांना ३१ डिसेंबर २०२५ रोजी अथवा त्यापूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल.

SBI Clerk निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रियेदरम्यान ऑनलाइन परीक्षा (Preliminary आणि Main exam) होईल

ही चाचणी निवडलेल्या स्थानिक भाषेत असेल

Preliminary examination : ऑनलाइन Preliminary परीक्षेसाठी १०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न असतील, त्याचा कालावधी १ तासाचा असेल

Mains examination : या परीक्षेत २०० गुणांसाठी १९० प्रश्न असतील. त्याचा कालावधी २ तास ४० मिनिटे राहील

स्थानिक भाषा प्रवीणता चाचणी : मेन परीक्षेनंतर, प्रोव्हिजनली निवड झालेल्या ज्या उमेदवारांनी राज्यातील विशिष्ट स्थानिक भाषेचा (इयत्ता १०वी अथवा १२वीत) अभ्यास केलेला नाही त्यांना स्थानिक भाषा प्रवीणता चाचणी (Local Language Proficiency Test) द्यावी लागेल. ही परीक्षा २० गुणांची असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT