Sarthak Sidhant Launches Public Portal pudhari
राष्ट्रीय

Sarthak Sidhant Launches Public Portal: सीबीएसईची पोलखोल केल्यानंतर आता सार्थकने सरकारचे १.६६ कोटी 'ते' रेकॉर्ड्स केले पब्लिक

Anirudha Sankpal

Sarthak Sidhant Launches Public Portal: सीबीएसईच्या १२ वी च्या निकालात झालेला गोंधळ बाहेर काढल्यानंतर आता १२ वीचा विद्यार्थी सार्थक सिद्धांतने अजून एक मोठा धमाका केला आहे. यापूर्वी त्याने सीबीएसई डिजीटल इव्हॅल्युएशन टेंडरचे सखोल विश्लेषण करत देशात भूकंप आणला होता. आता सार्थकने अजून एक मोठं काम केलं आहे. त्याने भारत सरकारच्या सेंट्रल पब्लिक प्रोक्योरमेंट (CPP) पोर्टलवरून जवळपास १.६६ कोटी रेकॉर्ड्स काढून एक पब्लिक पोर्टल लाँच केलं आहे. सार्थकने आपल्या सोशल मीडिया पोस्टवर हा दावा केला आहे.

नुकतेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सार्थकने आपल्या या नव्या पोर्टलची घोषणा केली. तो आपल्या पोस्टमध्ये लिहितो की, 'पारदर्शकपणा असा असावा की तो सर्वांपर्यंत सहज पोहचला पाहिजे. आज असाच पारदर्शकपणा होणार आहे.'

सार्थकने सांगितलं की गेल्या दोन आठवड्यापासून तो सरकारच्या सीपीपी पोर्टलवर मेहनत घेत होता. अखेर त्याला खरेदी विक्रीचे १.६६ कोटी रेकॉर्ड्स मिळवण्यात यश आलं आहे. आता हे सर्व रेकॉर्ड सामान्य नागरिक, पत्रकार आणि अभ्यासकांसाठी सार्वजनिक करण्यात आले आहेत. सार्थकने लोक हा डेटाबेस डाऊनलोड करून आपापल्या स्तरावर या सरकारी रेकॉर्ड्सची पडताळणी करावी या उद्येशाने हे काम केलं आहे. तो म्हणतो की पारदर्शकता आणण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले हे एक मोठे पाऊल आहे.

सार्थकचा यामागे लोकांना सरकारी खजिन्यातील पैसा कुठं आणि कसा खर्च होतो याची कल्पना असावी असा विचार आहे. सीपीपी पोर्टलमधून घेण्यात आलेल्या या अर्काईव्ह डेटाचा थेट उद्येश हा पब्लिक स्पेंडिंग म्हणजेच सरकारी खर्चाचे रेकॉर्ड शोधून त्याचे विश्लेषण सामान्य माणसांना सहज उपलब्ध करून देणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT