Sanjay Raut On rebel MP Security 
राष्ट्रीय

Sanjay Raut On Rebel MP Security: अर्धा तास ED, CBI द्या गिरीष महाजन तुम्हालाच.... राडेबाजीवर संजय राऊत स्पष्टच बोलले

Anirudha Sankpal

Sanjay Raut On Rebeal MP Security: आज दिल्लीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या संसदीय विधिमंडळाची बैठक झाली. मात्र या बैठकीला शिवसेनेचे बंडखोर ६ खासदार उपस्थित नव्हते. त्यानंतर संजय राऊत यांनी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन फुटीबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी आपल्या आधीच्या राडेबाजीच्या वक्तव्यावर देखील भाष्य केलं. अन् भाजप नेते गिरीष महाजन यांच्या वक्तव्यांचा देखील समाचार घेतला.

पत्रकार परिषेदत संजय राऊत यांनी आम्ही त्या खासदारांना सात दिवसांचा वेळ दिला आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. बघुया त्यानंतर काय येतं त्यानंतर आम्ही त्यांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू करणार असं देखील सांगितलं.

ही फूट नाही गद्दारी

संजय राऊत म्हणले की, 'तुम्ही ज्याला फूट म्हणते त्याला आम्ही फूट नाही तर गद्दारी, बेईमानी बदमाशी म्हणतो. हे सगळे लोकं पैशानं विकत घेतले आहेत. आज सकाळी यांना हॉटेल लिला मधून राजस्थान इथल्या जागी नेलं आहे. त्यांना असं का पळवत आहेत. मग ते लपून का राहत आहेत.

त्यांना दिल्ली सोडण्यापूर्वी १० कोटी रूपये प्रत्येकी देण्यात आले. त्यांना कोणापासून भीती आहे. आताच मी त्या गिरीष महाजन यांचे वक्तव्य ऐकलं हे काय राडे करणार असं ते म्हणाले, गद्दारांशी राडे करणार नाही तर कोणाशी करायचे. याचा अर्थ महाराष्ट्रात गद्दारी पोसण्याचं काम गिरीष महाजन तुम्ही करता.

पोलीस प्रोटेक्शन घेऊन काय फिरता

राऊत पुढे म्हणाले की, आमच्याकडे काय राहिले आहे असं महाजन म्हणतात. जरा पोलीस बाजूला ठेवून या. मग पोलीस प्रोटेक्शनमध्ये का फिरता. प्रत्येक गद्दाराला ४० जणांची सिक्युरिटी का दिली आहे. सुरक्षा काढा तुमच्या अंगावर चिंधी राहणार नाही.

राऊत यांनी गिरीष महाजन यांना आव्हान देखील दिलं. ते म्हणाले की, 'खाकी वर्दीची मस्ती दाखवू नका. माझ्याकडे एक दिवस ईडी आणि सीबीआय आली तर मी पहिल्यांदा गिरीष महाजन यांना फोडणार, नाही अर्ध्या तासात मी त्यांना फोडेन.... यांनी कुंभ मेळ्यात मोठा भ्रष्टाचार केला आहे. हे हिंदू म्हणवून घेतात आणि भ्रष्टाचार करतात.

राडेबाजीवर आव्हान देऊन नका द्यायचं असेल तर पोलीस प्रोटेक्शन सोडून या. ही आरएसएसची चड्डी विचार बिचार सगळं बाजूला राहील अन् पहिल्यांदा हीच फुटतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT