Sanjay Raut Post pudhari
राष्ट्रीय

Sanjay Raut Post: या देशात लोकांनी सर्वोच्च न्यायालय जाळून टाकलंय... माफी मागणाऱ्या राऊतांची आता वेगळीच पोस्ट

नुकतेच विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला होता.

Anirudha Sankpal

Sanjay Raut: संजय राऊत यांनी नुकतेच सर्वोच्च न्यायालयाची आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली होती. मात्र माफी मागतानाही त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेला पक्षचिन्हाच्या याचिकेत लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी देखील केली होती. आता मात्र संजय राऊत यांनी एक्सवर एक वादग्रस्त पोस्ट करत नव्या वादाला फोडणी दिली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत हे जाळपोळीचा एक व्हिडिओ शेअर करत आपल्या पोस्टमध्ये म्हणतात. 'अल्बानियात लोकांनी सर्वोच्च न्यायालय जाळून टाकले. सर्वोच्च न्यायालय भ्रष्ट पंतप्रधानांना मदत करत असल्याने लोक भडकले होते. आंदोलक जनतेने संसद आणि सरकारी कार्यालयावर मंत्र्यांच्या घरावर देखील हल्ले केले आहेत. सर्व देशांनी या घटनांपासून धडा घेतला पाहिजे.'

भारतातही सुरू आहेत आंदोलने

संजय राऊत यांनी या पोस्टद्वारे अनेक इशारे दिले आहेत. केंद्र सरकारने यापूर्वीच देशात अराजकता माजवण्यासाठी काही लोक आंदोलन करत असल्याचा आरोप केले आहेत. तसेच देशात विशेष करून दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या मागे परदेशी ताकद असल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. अशा परिस्थितीत संजय राऊत यांची ही पोस्ट नव्या वादाला जन्म देण्याची शक्यता नाकरता येत नाही.

राहुल गांधीचा सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा

नुकतेच विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला होता. त्या मोर्चात सर्व विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते. त्यावरून सर्वोच्च न्यायालायने नाराजी व्यक्त केली होती. यावेळी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून देखील सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते. त्यानंतर राऊत यांनी माफी मागितली होती. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयासंदर्भात वादग्रस्त पोस्ट केली आहे.

अल्बानियात का भडकलेत लोक?

अल्बानिया युरोपच्या बाल्कन क्षेत्रातील एक देश आहे. अल्बानियाची राजधानी तिराना मध्ये ऑक्टोबर २०२६ दरम्यान, पंतप्रधान एडी रामा यांच्या सरकारविरूद्ध आंदोलनाने वेग पकडला आहे. या आंदोलनात विद्यार्थी, तरूण आणि सरकार विरोधी सामील झाले आहेत. आंदोलकांनी पंतप्रधान एडी रामा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT