Sanjay Raut  Pudhari
राष्ट्रीय

Sanjay Raut | राज्य मंत्रिमंडळातील ९ मंत्री भोंदूबाबा अशोक खरातचे नियमित भक्त: संजय राऊत यांचा दावा

मंत्री भोंदूबाबाकडे जाऊन अत्यंत घृणास्पद विधि करत असल्याचा गंभीर आरोप

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Raut on Ashok Kharat Case

नवी दिल्ली : राज्य मंत्रिमंडळातील ९ मंत्री भोंदूबाबा अशोक खरात याचे भक्त असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी (दि.२०) केला. हे मंत्री भोंदूबाबाकडे जाऊन अत्यंत घृणास्पद विधि करत होते, असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला. या प्रकरणी कारवाईचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, हे कौतुकास्पद असल्याचे संजय राऊत म्हणाले.

त्यांनी या संपूर्ण घडामोडींची तुलना आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या “एपस्टिन फाइल्स” प्रकरणाशी केली. “जगात एपस्टिन फाइल्स आणि महाराष्ट्रात खरात फाइल्स,” असे वक्तव्य त्यांनी केले. खरात प्रकरणाची पाळमुळे उखडून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृहखात्याच्या माध्यमातून जी मोहिम राबवली , त्यासंदर्भातील माहिती आता समोर येत आहे.

या महाराष्ट्राल कलंकित करणारी, बदनाम करणारी अशी कृत्य, त्याचे सूत्रधार आणि त्यांना राजकीय, सामाजिक प्रतिष्ठा देणारे राजकीय नेते, मंत्री या सगळ्यांचे धाबे मुख्यमंत्र्यांच्या कारवाईमुळे दणाणलेले दिसत आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांवर नेहमी टीका करतो, कालही आम्ही याप्रकरणात त्यांच्यावर टीका केली. पण जसजशी माहिती समोर येत आहे की, गेल्या १५ दिवसांपासून अत्यंत गुप्तपणे मुख्यमंत्र्यांनी खरात फाईल्स संदर्भात कारवाईचे आदेश दिले होते, असे संजय राऊत म्हणाले. पोलिसांची पथके काम करत होती, ते ऑपरेशन यशस्वी झाले, असे म्हणत राऊतांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्र्यांनी याबाबत साफसफाई सुरू केली असेल तर ते कौतुकास पात्र आहेत, असे ते म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, अशोक खरात हा फडणवीसांच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्र्यांचे गुरूमहाराज आहेत, त्याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे फडणवीसांच्या मंत्रीमंडळातील अर्धे मंत्री तणावाखाली आहेत. काही लोकांना तर आयसीयूमध्ये भरती करावे लागले आहे, अशी माहिती समोर येत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांना तर राजीनामा द्यावा लागेल, त्यांचा राजीनामा घेण्यात मुख्यमंत्री कमी पडले तर ते राज्याचे दुर्दैव ठरेल, असे राऊत म्हणाले.

'बाबाच्या शिफारसीने शिक्षण खात्याच्या बदल्या आणि बढत्या'

दिपक केसरकर शिक्षण मंत्री असताना शिक्षण खात्यातील सर्व बदल्या आणि बढत्या याच खरात बाबाच्या शिफारशीने होत असत, असा दावा देखील संजय राऊत यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये केला. या कामासाठी खरात अनेकदा नरिमन पॉइंट ट्रायडेंट मध्ये मुक्कामी होता, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT