Administrator
राष्ट्रीय

Samsung India चा २०० कर्मचाऱ्यांना नारळ, दिले 'हे' कारण

Samsung India lay off | चेन्नईतील कर्मचारी संपावर, उत्पादनाला फटका

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

कोरियाची इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स (Samsung India) भारतीय उद्योगातील सुमारे २०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. ग्राहकांकडून मागणी कमी झाल्यामुळे त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीवर परिणाम होत आहे. परिणामी, त्यांच्या व्यवसायातील वाढ मंदावत आहे. यामु‍ळे कंपनीने स्मार्टफोनच्या त्यांच्या रोख व्यवसायातील बाजारातील स्थान गमावले आहे. त्यासाठी नफ्यात सुधारणा करण्यासाठी खर्चात कपात केली जात असल्याचे चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबतचे वृत्त द इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.

ही नोकरकपात कंपनीच्या मोबाईल फोन्स, कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस आणि सपोर्ट फंक्शन्समध्ये केली जाणार आहे. ही नोकरकपात त्यांच्या सुमारे २ हजार एक्झिक्यूटिव्हज मनुष्यबळाच्या ९ ते १० टक्के एवढी असेल.

चेन्नईतील कर्मचारी संपावर, उत्पादनाला मोठा फटका

चेन्नईच्या कारखान्यातील कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे सणासुदीच्या दरम्यान सॅमसंग टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. सदर कंपनी अजूनही ५० ते ८० टक्के क्षमतेच्या उत्पादनासह प्लांट चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्तात पुढे म्हटले आहे.

Samsung India lay off : नोकरकपातीचा आकडा वाढणार

देशातील सर्वात मोठी कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल फोन उत्पादक कंपनी असलेली सॅमसंग त्याच्या ऑपरेशनचीदेखील पुनर्रचना करण्याची शक्यता आहे. यात टेलिव्हिजन आणि घरगुती उपकरणे यांसारख्या काही व्यावसायिक विभागांच्या विलीनीकरणाचा समावेश असू शकतो. असे केल्याने नोकरकपातीचा आकडा वाढू शकतो, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ही कार्यवाही व्यवस्थापन स्तर, मनुष्यबळ, ओव्हरहेड्स, अकार्यक्षमता कमी करण्याच्या उद्देशाने आहे. याबाबतचा अंतिम निर्णय दिवाळीनंतर घेतला जाणार असल्याचे समजते.

सॅमसंगने नवीन नोकरभरती थांबवली

सॅमसंग इंडियाने नवीन भरतीदेखील थांबवली आहे. तसेच कंपनीमधील ऑफ-रोल कर्मचाऱ्यांची संख्यादेखील कमी होऊ शकते. ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाते; त्यांना एम्प्लॉयमेंट करारानुसार तीन महिन्यांचा पगार आणि कंपनीतील प्रत्येक वर्षाच्या सेवेसाठी एक महिन्याच्या पगाराचे विभाजन पॅकेज दिले जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT