Russian military planes Noida Airport File Photo
राष्ट्रीय

BRICS Summit 2026: ब्रिक्स परिषदेपूर्वी नोएडा विमानतळावर पहिले परदेशी लँडिंग; रशियाची तीन शक्तिशाली लष्करी विमाने दाखल

ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर, रशियन लष्कराची तीन विमाने नोएडा विमानतळावर दाखल झाली. नवी दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे येत्या १२ आणि १३ सप्टेंबर रोजी १८ वी ब्रिक्स परिषद पार पडत आहे.

पुढारी वृत्तसेवा

BRICS Summit 2026 India

नवी दिल्ली: ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर, रशियन लष्कराची तीन विमाने मंगळवारी सकाळी नोएडा विमानतळावर दाखल झाली. नुकत्याच सुरू झालेल्या या नव्या विमानतळावर एखाद्या परदेशी विमानाचे झालेेले हे पहिलेच लॅंडिंग आहे.

मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही विमाने धावपट्टीवर उतरली. यामध्ये रशियन लष्कराच्या 'आयएल-७६' (IL-76) या मालवाहू विमानाचाही समावेश आहे. या विमानांमधून रशियन अग्रिम पथक आणि काही लष्करी अधिकारी भारतात पोहोचले आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आगामी भारत भेटीची पूर्वतयारी आणि नवी दिल्लीत होणाऱ्या १८ व्या ब्रिक्स परिषदेशी या घडामोडींचा संबंध जोडला जात आहे. या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी विमानतळ प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे.

विमानतळावरच रशियन विमानांचे पार्किंग

ही तिन्ही लष्करी विमाने बुधवारी दिवसभर विमानतळाच्या धावपट्टीवरच उभी होती. विमानतळावरील सुरक्षा अधिकारी आणि रशियन पथक संयुक्तपणे या विमानांवर आणि सुरक्षेच्या व्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवून आहेत. परदेशातून येणारी लष्करी विमाने सामान्यतः दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतात. मात्र, नोएडा विमानतळावर रशियन विमानांचे झालेले हे लॅंडींग नव्या विमानतळासाठी एक ऐतिहासिक आणि महत्त्वाची सुरुवात मानली जात आहे.

१२ आणि १३ सप्टेंबर रोजी ब्रिक्स परिषद

नवी दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे येत्या १२ आणि १३ सप्टेंबर रोजी १८ वी ब्रिक्स परिषद पार पडत आहे. या परिषदेला जगातील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख आणि पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन देखील सहभागी होणार आहेत. परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षेचा प्रोटोकॉल आणि हालचालींच्या नियोजनाचा एक भाग म्हणून रशियन लष्कराची ही विमाने नोएडा विमानतळावर उतरवण्यात आणि उभी करण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT