Mohan Bhagwat Speech pudhari
राष्ट्रीय

Mohan Bhagwat Speech: 'शूद्र सत्ता स्वार्थासाठी'... सरसंघचालक मोहन भागवत विरोधकांच्या आंदोलनावर नेमकं काय म्हणाले?

मोहन भागवत यांनी विरोधाचे वारे हे पश्चिमेकडून आले असल्याचं सांगत भारतात जे काही होत आहे त्या पाठीमागे विदेशी शक्ती असल्याचे सुतोवाच केले आहे.

Anirudha Sankpal

Mohan Bhagwat Speech: दसऱ्याच्या शस्त्र पूजनानंतर नागूपरच्या संघ मुख्यालयातून सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या स्वयंसेवकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशात सुरू असलेल्या आंदोलनावर आणि रेजिम चेंज देखील भाष्य केलं आहे. मोहन भागवत यांनी विरोधाचे वारे हे पश्चिमेकडून आले असल्याचं सांगत भारतात जे काही होत आहे त्या पाठीमागे विदेशी शक्ती असल्याचे सुतोवाच केले आहे.

ज्यांना संघाची प्रगती सहन होत नाही

मोहन भागवत आपल्या भाषणात म्हणाले, 'एवढ्या मोठ्या देशात एकसंघ वातावरण बनवण्यासाठी वेळ लागेल. सर्वसाधारण व्यक्ती, विशिष्ट विचार लागू करावा लागेल तर तो नागरिकांना आचरणात आणण्यासाठी सतत प्रयत्न करावा लागेल.' तसेच मोहन भागवत यांनी ज्यांना संघाची प्रगती सहन होत नाही. ते संघाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.' असे म्हणत नाव न घेता संघावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं.

प्रगत देश देखील होरपळत आहेत

मोहन भागवत पुढे म्हणाले, 'संघकार्य स्वयंसेवकांच्या त्यागावर चालते. सत्यावर आम्ही चाललो आहे. समाजाला संघटित करण्याचे कार्य सुरू आहे.' भागवत यांनी परदेशात सुरू असलेल्या घडामोडींचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले, 'पश्चिमेतून विरोधाचे विचार आले आहे आहे. प्रगत देश देखील त्यात होरपळत आहेत. फ्रान्स, नेपाळ, बांगलादेशमध्ये काय चालले आहे. रेजिम चेंज केल्याने परिस्थिती बदलणार असे म्हणतात. भारत हे परम लक्ष्य आहे. भारतातही असे प्रयत्न सुरू आहेत.'

शूद्र सत्ता स्वार्थामुळे..

भागवत म्हणाले, 'भारतात दशकभरापासून सक्षम नेतृत्व सुरू आहे. आता जे सुरू आहे ते शूद्र सत्ता स्वार्थामुळे सुरू आहे. आपला देश प्रगती करत आहे. मात्र समस्या आहेत. त्यामुळे आंदोलन होणारच. मात्र आंदोलन समाधानासाठी झालं पाहिजे. द्वेष निर्माण होऊ नये. संभाषण झालं पाहिजे चांगल्या भाषेचा वापर झाला पाहिजे. स्वस्त लाभ नको. याबाबत समाजाला विचार करावे लागेल.'

आंदोलनांबाबत बोलताना भागवत यांनी आंदोलनातून समाधान मिळेल का असा सवाल विचारला. ते पुढे म्हणाले की, संघाने शाळांबाबत काम केलं आहे. अनेक प्रांतातून स्वयंसेवकांना एकत्र करून शाळांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. बाराशेहून अधिक शाळांमध्ये चांगले काम झाले आहे. तेथे ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांमुळे परिस्थिती सुधारली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT