Mohan Bhagwat London Visit: अमेरिकेनंतर आता लंडनमध्ये मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला विरोध

२० नागरी समाज संघटनांचे महापौरांना पत्र
Mohan Bhagwat
Mohan BhagwatFile Photo
Published on
Updated on

Mohan Bhagwat London Visit : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आगामी लंडन दौऱ्याला आणि कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेतील वादानंतर आता लंडनमध्येही त्यांच्या कार्यक्रमावरून विरोधाचे सूर उमटले आहेत. सुमारे २० नागरी समाज संघटनांनी लंडनचे महापौर सादिक खान यांना पत्र लिहून ग्रेटर लंडन अथॉरिटीने संघाच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकावा, अशी मागणी केली आहे.

मोहन भागवत यांचा लंडन दौरा सुरु

सरसंघचालक मोहन भागवत यांनी लंडनमधील मंदिर आणि गुरुद्वारे दौर्‍याला सुरुवात केली आहे. आरएसएसच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने अमेरिका, कॅनडा आणि युकेमध्ये सध्या सुरू असलेल्या संपर्क मोहिमेचा हा दौरा एक भाग आहे. भागवत या दौऱ्यादरम्यान विविध धर्मांचे नेते, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि इतर मान्यवरांची भेट घेणार असल्याचे आरएसएसच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुनील आंबेकर यांनी शुक्रवारी दिली.

Mohan Bhagwat
Mohan Bhagwat: "भारतात मुस्लिम नकोत म्हणणारा हिंदू असूच शकत नाही": न्यूयॉर्कमधील कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान

मोहन भागवत लंडनमध्‍य राहणार्‍या भारतीय समुदायाला करणार संबोधित

गेल्या आठवड्यात लंडनस्थित अनेक हिंदू संघटनांनीही या कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. या दौऱ्यादरम्यान मोहन भागवत लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा आंतरराष्ट्रीय संपर्क अभियान कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन या दौऱ्याचा भाग आहेत. यापूर्वी न्यू यॉर्क शहरातल्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये ‘युनिव्हर्सल ओपननेस सेलिब्रेशन्स’ अंतर्गत असाच कार्यक्रम पार पडला होता, जिथे त्यांना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते.

Mohan Bhagwat
Mohan Bhagwat New York Event : RRS प्रमुख मोहन भागवत यांच्या न्यू यॉर्कमधील कार्यक्रमाच्या आयोजकांचे 'X' खाते 'सस्पेंड'

कार्यक्रमासाठी सभागृह देऊ नये

महापौरांना पाठवलेल्या पत्रात नागरी समाज संघटनांनी संघाच्या कार्यक्रमासाठी कोणतेही सभागृह किंवा जागा (वेन्यू) देऊ नये, अशी विनंती केली आहे. ब्रिटिश वृत्तपत्र 'द इंडिपेंडंट'नुसार, पत्र लिहिणाऱ्या संघटनांनी आरएसएसला 'एक हुकूमशाही आणि लष्करी विचारसरणीचा गट' असे संबोधले असून तो युरोपीय फॅसिझमपासून प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. तसेच ब्रिटनच्या बहुसंस्कृतीवादाचे आणि बहुसांस्कृतिक समाजाचे संरक्षण निश्चित करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केले आहे.

Mohan Bhagwat
Mohan Bhagwat on Gen Z Protesters| आंदोलक 'जेन झी' देशद्रोही नाहीत, सरसंघचालक मोहन भागवत यांचे खडेबोल

पोलिसांकडे सुरक्षिततेची मागणी

ब्रिटनच्या परराष्ट्र कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात 'हिंदूज फॉर ह्युमन राइट्स', 'यूके-इंडियन मुस्लिम कौन्सिल', 'इंडिया लेबर सॉलिडॅरिटी' आणि 'साउथ एशिया सॉलिडॅरिटी ग्रुप' यांसह २० संघटनांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हा दौरा केवळ जनसंपर्क अभियानाचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पत्रात मेट्रोपोलिटन पोलिसांकडून विविध समुदायांच्या सुरक्षेसाठी काय पावले उचलली जात आहेत, याची माहिती मागवण्यात आली आहे.पत्रात नमूद केल्यानुसार, "ब्रिटनमध्ये संघाकडून निर्माण होणारा धोका वास्तविक आहे. भागवत यांच्या या दौऱ्यामुळे ब्रिटनमधील संघाच्या समर्थकांना द्वेषपूर्ण भाषणे पसरवण्यास, भारतीय समुदायात फूट पाडण्यास आणि संवेदनशील घटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यास खतपाणी मिळेल."

ब्रिटिश खासदारांमध्ये मतमतांतरे

ब्रिटनचे माजी लेबर नेते जेरेमी कॉर्बिन यांनी या दौऱ्यावर टीका करताना म्हटले की, "ब्रिटनने अशा कोणत्याही द्वेष पसरवणाऱ्या गटाच्या नेत्याचे आदरातिथ्य करू नये, ज्यांचा इतिहास अलोकतांत्रिक राहिला आहे आणि जे उजव्या विचारसरणीच्या हिंसेत सामील राहिले आहेत. ही एक अत्यंत हुकूमशाही, भेदभाव करणारी संस्था आहे ज्यांनी धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच केला आहे." दुसरीकडे, ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमैन यांनी मात्र या कार्यक्रमाचे स्वागत केले आहे. ब्लॅकमैन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत म्हटले, "आरएसएस प्रमुख डॉ. मोहन भागवत यांच्याकडून संघाच्या भविष्यातील वाटचालीबाबतचे विचार आणि कल्पना ऐकून मला आनंद झाला."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news