Priyanka Vadra Land Dispute pudhari
राष्ट्रीय

Priyanka Vadra Land Dispute: प्रियांका वाड्रांचे कुटुंबीय भिडले ९० वर्षाच्या आजीबाईंना... ४ एकर जमिनीचं नेमकं प्रकरण काय?

Anirudha Sankpal

Priyanka Vadra Land Dispute: उत्तराखंडमधील ऊधमसिंह नगरच्या किच्छामध्ये ४ एकर जमिनीचा एक वाद सुरू आहे. तसं भारतात दर अर्ध्या किलोमिटरवर कोणाच्या ना कोणात्या जमिनीचा वाद असतोच. मात्र या वादाशी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वाड्रा आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा नाव जोडलं गेलं असल्यामुळं हे प्रकरण राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरलं आहे. जमिनीच्या मालकी हक्कावरून काँग्रेसने एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप केला आहे.

हे संपूर्ण प्रकरण स्वर्गीय कुलसुम खान यांच्या शेतीशी संबंधित जोडलं गेलं आहे. आता त्यांच्या संपत्तीवर त्यांची ९० वर्षाची बहिण नसरीन सांगा यांचा कब्जा आहे. दुसरीकडे रॉबर्ट वाड्रा यांची वहिणी असल्याचा दावा करणाऱ्या सायरा वाड्रा कुलसुम खान यांना आपली आत्या सांगतात.

कोर्टाच्या आदेशानंतरच पुढची कारवाई

कुलसुम खान शेत जमिनीवर मालकी हक्क दावेदारी प्रकरणात एडीएम पंकज उपाध्याय यांनी मध्यस्थी करून दोन्ही पक्षकारांच्या वकिलांशी चर्चा केली होती. त्यानंतर एडीएम उपाध्याय यांनी हे प्रकरण सिविल कोर्टात असल्यानं कोर्टाचा आदेश मिळाल्यावरच यावर पुढची कारवाई होईल असं सांगितलं. त्यावर काँग्रेस नाराज असून त्यांनी जर हे प्रकरण कोर्टात असेल तर दुसरी पार्टी जबरदस्तीने या जमिनीवर कसा कब्जा करू शकते अशी विचारणा ते करत आहेत. त्यांनी प्रशासनाने एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप ठेवला आहे.

प्रकरण प्रियांका गांधींशी जोडलं गेलं

कुलसुम खान यांच्या कृषी फार्ममध्ये सध्याच्या घडीला १२ एकर जमीन आहे. रिचर्ड वाड्रा यांची पत्नी सायरा वाड्रा या दिल्लीत राहतात. त्यांनी सांगितल की त्या प्रियांका गांधी यांच्या जेठानी आहेत. त्यांनी दावा केला की कुलसुम खान या त्यांच्या आत्या होत्या. त्या अविवाहित असल्यामुळं त्यांना कोणता वारसा नाही. त्यामुळं त्यांनी आपल्या कृषी फार्म त्यांनी त्यांच्या नावावर केले होते.

बुधवारी नसरीन सांगांनी केला कब्जा

डिसेंबर २०२५ मध्ये कुलसुम खान यांचे निधन झाले. तेव्हापासून सायरा वाड्रा यांच्याकडे या फार्मचा ताबा आहे. बुधवारी कुलसुम खान यांची बहिण नसरीन सांगा यांनी त्यांच्या अनुपस्थितीत अवैधरित्या कब्जा केला. त्यांनी त्यांच्या कामगारांना शेतातून बाहेर काढलं. सायरा वाड्रा यांनी बुधवारी आरोप केल्यानंतर सायंकाळी आमदार तिलकरात बेहड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फार्मच्या गेटवर आंदोलन केलं. प्रियांका वाड्रा यांचे नाव आल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस सायरा वाड्रा यांच्या समर्थनात पुढे आली अन् प्रकरणाला राजकीय वळण लागलं.

दोन्ही पक्षाचे म्हणणे काय?

सायरा वाड्रा यांचे वकील पीयुष पंत यांनी माध्यमांना सांगितलं की, त्यांनी मालकी हक्कासंदर्भातील सर्व कागदपत्रे प्रशासनाला दाखवले आहे. मात्र दुसऱ्या पक्षाकडून कोणतेही कागद दाखवण्यात आलेले नाहीत. प्रशासनाने फार्मजवळ कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण अजून कोर्टात असून कोर्टाचा आदेश मिळाल्यानंतर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

दरम्यान, नसरीन सांगा यांचे वकील शुभम छाबडा यांनी सांगितलं की आम्ही मालकी हक्काबाबतचे सर्व कागदपत्रे प्रशासनासमोर सादर केली आहेत. नसरीन यांना कुलसुम यांच्या मृत्यूपत्रा बाबत देखील आक्षेप आहे. नसरीन यांचे नाव वारसाहक्काने लागले आहे. नसरीन सांगा यांचे पहिल्यापासूनच जमिनीवर कब्जा राहिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT